WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विज देयके, पाणी कर व ग्रुह कर माफ करा, न्युज मिडीया पञकार असोसिएशनची ठाकरे सरकारला निवेदनाद्वारे केली मागणी

ImageImageImage

१३ जून, सह्याद्री.न्यूज...

सद्या जगात व आपल्या देशासह राज्यात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. या रोगाचा रोकथाम करण्यासाठी शासनाने सर्वञ लाँकडाऊन केले आहे. या लाँक डाऊनला पहाता पहाता तिन महीने लोटुन गेले आहे. परिणामी या लाँकडाऊनमुळे सर्वसामान्य गोर गरीब हातावर आणुन पानावर खानार्यांच्या हातचा रोजगार बंद झाला आहे.परिणामी गोर गरीब जनतेवर आर्थिक संकट कोसळले असुन त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच आता विधुत देयके, पाणी कर,ग्रुह कर यासह शाळेची फी भरणे कठिण झाले आहे . ज्यांचेकडे पोट भरण्यासाठी हातात पैसे नाही ते कर कसे भरणार? याकरिता न्युज मिडीया पञकार असोसिएशनने तिन महिण्याचे विधुत देयके, एका वर्षाचे पाणी कर,ग्रुह कर व शाळेची फि माफ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना येथिल उपविभागीय अधिकारी शरद जावळे याच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी न्युज मिडीया असोसिएशन चे अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष दिपक छाजेड, सचिव परशुराम पोटे ,सल्लागार रज्जाक पठाण, सहसचिव निलेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा, प्रसिद्धी प्रमुख महादेव दोडके, ईकबाल शेख, सागर मुने, ज्ञानेश्वर बोनगीनवार, नरेन्द्र लोणारे, रवि कोटावार, विशाल ठोंबरे, दिगांबर चांदेकर, कायदेशिर सल्लागार जाहिद शरिफ उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share