WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

होम कॉरंटाईन असलेल्या व्यक्तींशी सन्मानाने वागा

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना बाधितांची संख्या देशासह महाराष्ट्र व विदर्भातही झपाटयाने वाढत असल्याने परठिकाणांवरून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांमुळे शरवासियांमध्ये भीती निर्माण होत असून त्याचे पर्यावसन वादावादीमध्ये होत असल्याचे चित्र काही प्रभागांमध्ये पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने परजिल्हा व परप्रांतात अडकलेले बहुतांश नागरिक शहरात दाखल होत असून त्यांना पळसोनि येथील कोविड केंद्रात हातावर शिक्के मारून १४ दिवस होम कॉरंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु त्यांच्यापासून संसर्ग होण्याच्या भीतीने काही शांत स्वभावाच्या लोकांना शेजारील मंडळी वादावादी करून त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यागत वागत असल्याचे चित्र आज शहरात पाहायला मिळत आहे. धुनी भांडनी करण्याकरिता घराच्या आवारातही निघाल्यास शेजारील मंडळी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवितांना दिसतात. शासनाने कित्येकदा आवर्जून सांगितले की आपले युद्ध कोरोनाशी आहे जनतेशी नाही पण काही भांडनखोर प्रवृत्तीचे लोक बाहेरून आल्याच्या कारणावरून विनाकारण वादावादी करून या होम कॉरंटाईन असलेल्या शांतस्वभावाच्या लोकांना नाहक त्रास देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणूनच परठिकाणावरून आलेल्या लोकांना होम कॉरंटाईन केल्या जात असल्याचे माहित असतांना देखील काही महाभाग या साध्यासुध्या लोकांना अकारण शिवीगाळ करून त्यांचं स्वतःच्याच घरात राहणं कठीण करीत आहेत. ते बाहेर फिरतांना आढळले किंवा लपून चोरून बाजारांमध्ये गेल्याचे आढळल्यास प्रशासनाला कळविण्याची मुभा असतांना ते घराच्या दरवाज्यात आले तरी स्वतःच अधिकारी बनून त्यांना धाक दपट करतात. कोरोनाची भीती असणं स्वाभाविक आहे पण त्यापासून सावधगिरीच्या उपाययोजना अंगिकारण्या ऐवजी जे बाहेरून आले त्यांच्यावर नुसत्या संशयातून बहिष्कार टाकन्याचे प्रकार शहरातील काही भागांमध्ये सऱ्हास पाहायला मिळत आहे. आता नुकतीच दिल्लीवरून शहरात दाखल झालेल्या नागरिकांबाबत संधिग्नता निर्माण झाली होती. त्यांच्या सोबत प्रवास करणारा प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याचा चर्चेने संपूर्ण शहरात भेटीचं वातावरण निर्माण झालं होत पण प्रशासनाने त्यांची प्राथमिक तपासणी करून होम कॉरंटाईन केल्याचे कळविल्यानंतर लोकांच्या जिवंत जीव आला. होम कॉरंटाईन असलेल्या प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य प्रशासनाजवळ नोंदी असून प्रशासन त्यांच्यावर बारीक नजर ठेऊन आहे. त्यामुळे शहरवासीयांनी बाहेरून आलेल्या नागरिकांना नाहक त्रास देण्या ऐवजी त्यांच्याकडून कॉरंटाईनचे नियम मोडले गेल्यास थेट प्रशासनाला कळविण्यात यावे. असा भावनिक सूर या कॉरंटाईन असलेल्या व्यक्तींमधून ऐकायला मिळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share