WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मनसेच्या पुढाकाराने राजूर कॉलरी येथे जल शुद्धीकरण यंत्र (वॉटर एटीएम) बसविण्यात आले

ImageImage

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :- तालुक्यातील राजूर कॉलऱी येथील विविध समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून व त्या सोडविण्या करिता काही दिवसांआधी ग्रामपंचायतेला निवेदन देऊन त्याचा सतत पाठपुरावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रदीप बांदूरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून ग्रामपंचायतेने त्यांच्या मागण्यांची दखल घेत राजूर कॉलरी येथे जल शुद्धीकरण यंत्र (वॉटर एटीएम) बसविण्यात येऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

गाव शहरातील विविध समस्या शासन व प्रशासन दरबारी रेटून त्यांचे निराकरण करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या मनसेने नेहमी सर्वसामान्य जनतेला आवश्यक त्या सुविधा मिळवून देण्यास प्राधान्य दिले आहे. शहर अथवा गावात निर्माण झालेल्या कोणत्याही समस्या असो वा शासन प्रशासनाच्या कोणत्याही विभागाकडून जनतेवर होणारा अन्याय असो मनसेचे पदाधिकारी नेहमी जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. जनहिताच्या कल्याणा करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदा तत्पर राहिली आहे. शहर वा गावात कोणत्याही प्रकारचा दुष्काळ पडलेला असो किंवा जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असो मनसेने नेहमी पुढाकार घेऊन जनतेला मदत केली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व रोजंदार वर्गांना शासकीय व प्रशासकीय कार्यालये, सरकारी दवाखाना अथवा बँकेकडून सेवा पुरविण्यास दिरंगाई होत असल्यास किंवा त्यांच्याकडून कामे करवून घेण्यास नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्यास मनसेने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना जनतेच्या समस्यांचे समाधान करण्यास भाग पाडले आहे. राजूर कॉलरी येथील विविध समस्यांबाबतही ग्रामपंचायतेला अवगत करून त्या सोडविण्या करीता सतत ग्रामपंचायतेकडे पाठपुरावा करणारे मनसेचे प्रदीप बांदूरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून गावात जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेला यामाध्यमातून पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळणार आहे. राजूर कॉलॅरी व राजूर ईजारा या दोन्ही गावांना जल शुद्धीकरणाचा लाभ होणार आहे. या प्रशंसनीय कार्याबरोबरच ग्रामपंचायतेने अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करण्याची मागणी मनसेचे प्रदीप बांदूरकर यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share