वणी ते घुग्घूस वाहतूक मार्ग बदलला, पहा तो असा...
•पोलीस प्रशासनाकडून जनतेला सहकार्य करण्याचे आव्हाहन...
१९ जून,सह्याद्री न्यूज...
चंद्रपूर- वणी ते घुग्घूस या वर्धानदीच्या पुलाचे बांधकाम करणे असल्याने सदरचे वाहतूक सर्व बंद केल्याखेरीज करणे शक्य नसल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-१, चंद्रपूर यांनी सदरची रस्त्याची वाहतूक बंद करून पर्यायी रस्त्याने वळविण्याबाबत विनंती केली आहे. जनतेला त्रास व असुविधा होऊ नये तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता घुग्घूस ते वणी रस्ता बंद करुन पर्यायी निश्चित करणे आवश्यक आहे. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१, च्या कलम-३३(१)(ब) अन्वये प्राप्त कायदेशीर अधिकारान्वये जनतेला धोका, अडथळा किंव्हागैरसोय होऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १४ घुग्घुस-वणी मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाचे काम करणे असल्याने सदरचा रस्ता दि.२२ जून २०२० पासून ३० दिवसाकरिता सर्व वाहकांना रहदारीस बंद करण्यात येत आहे. वाह्तुकींना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे जनतेला निर्देश देण्यात येत आहे.
•पर्यायी मार्ग- (अ) घुग्घूस-नाकोडा-मुंगोली-सिंधोला-आवई फाटा-चारगाव चौकी ते वणी.
•पर्यायी मार्ग- (ब) घुग्घूस ताडाली-घोडपेठ-भद्रावती-कोंढा-माजरी-पाटाला ते वणी.
•पर्यायी मार्ग (क) घुग्घूस-ताडाली-भद्रावती-वरोरा-वणी असा असेल...
सदर अधिसूचना दि.२२-०६-२०२० पासून ३० दिवसापर्यंत अंमलात राहील. वारी निर्द्शनाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हाहन करणायत येत आहे.
त्याबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१. चंद्रपूर यांनी वळती करण्यात येणाऱ्या पर्यायी रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावावेत असे डॉ. महेश्वर रेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडून कळविण्यात येत आहे.
संपादन- कुमार अमोल, महाराष्ट्र