WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संतोष वाटेकर मृत्यू व अपहार प्रकरणात शहरातील एका व्यावसायिकाला अटक

ImageImageImageImageImage

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :-

भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये रोकड भरण्याचे काम करणाऱ्या एका खाजगी संस्थेचा कर्मचारी असलेल्या संतोष वाटेकर याने एटीएम मध्ये भरण्यात येणाऱ्या पैशामध्ये अपहार करून लाखो रुपयांची बँकेची रोख रक्कम घेउन तो शहरातून पसार झाल्याची घटना काही दिवसांआधी घडली होती. नंतर त्याचा कोरपना तालुक्यातील गाडेगाव शिरूर मार्गावरील जंगलात मृतदेह आढळून आल्याने अनेक शंका कुशंकांना पेव फुटले होते. तेंव्हा पासून या अपहार व मृत्यु प्रकरणाचा तपास सुरु असून बुधवारी रात्री वनी शहरातील लखन उर्फ़ रविकांत नक्षिने या व्यवसायिकास याप्रकरनात संशयित म्हणून चंद्रपुर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला कोरपना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शहरात अनेक चर्चांना उधान आले आहे.

विट्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेला संतोष वाटेकर हा इपिएस लॉजी कॅश सोलुशन प्रा. ली. या कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे स्टेट बँकच्या एटीएम मध्ये रोकड़ भरण्याचे काम दिल्या गेले होते. २० फेब्रूवारिला बँकेमधून २८ लाख रुपयांची रोख रक्कम घेउन एटीएम मध्ये भरन्याकारिता गेलेला संतोष नंतर परत आलाच नहीं. त्याचबरोबर २८ लाख रुपयांची रोकड़ही एटीएम मध्ये भरल्या गेली नसल्याने तो रोकड घेऊन पसार झाल्याची वार्ता शहरभर पसरली. अशातच २९ फेब्रूवारिला कोरपना तालुक्यातील जंगलात त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृत देह आढळून आल्याने या अपहार प्रकरनाला वेगळेच वळन लागले. मृतदेह एवढा छिन्नविछिन्न झाला होता की त्याच्या पत्निलाही ओळख पटायला बराच वेळ लागला. नंतर चंद्रपुर गुन्हे शाखेने याप्रकरनाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. लॉकडाउनमुळे संत गतीने सुरु असलेला तपास लॉकडाउन शिथिल झाल्याने आणखी जोमात सुरु झाला आहे. या तपासांतर्गत वणी येथील बार चालक लखन उर्फ़ रविकांत नक्षिने याला चंद्रपुर पोलिसांनी संशयित म्हणून अटक केल्याने शहरात विविध चर्चाना उधान आले आहे. संतोष वाटेकर हा मद्याशोकिन असल्याने त्याचे बारमध्ये नेहमी उठने बसने असायचे. तो व्याजाने पैसे वाटत असल्याने त्याचे मित्रही तगड़े होते. खाजगी संस्थेकड़े एटीएम मध्ये रोकड़ भरण्याचे काम करणाऱ्या संतोषने अल्पावधितच शहरात चांगलीच ओळख निर्माण केली होती. त्याचे शेवटचे लोकेशन लखन बारमध्ये आढळल्याने बार चालक लखन नक्षिने याला संशयित म्हणून त्याब्यात घेउन कोरपना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यानंतर हे प्रकरण कोणते वळन घेते याकडे समस्त शहर वासियांचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share