मातृत्व लादणाऱ्याला अखेर अटक, नागपूर पोलीसाची कारवाई
१९ जून,
नागपूर येथील विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करित तिच्यावर मातृत्व लादणारा आरोपी विपिन रामाजी दाते नागपूर पोलिसांनी केली अखेर अटक.
पिडीतेने केली होती नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.
मारेगांव तालुक्यातील शिवणी धोबे येथील विपिन रामाजी दाते (३०)हा कामानिमित्त नागपूर येथे गेला. नागपुरातील समता नगरात नातेवाईकाकडे वास्तव्य करित असतांना त्या नातेवाईकाच्या विवाहित महिले सोबत सुत जुळविले. परिणामी सदर विवाहित महिला ही पतीच्या सततच्या वादाने कंटाळून माहेरी राहु लागली होती.
या दरम्यान विपिनने लग्नाचे आमिष दाखवित तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवून मातृत्व लादले. काही दिवसातच 'तो' स्वतः चे गावी येवून दुसरां संसार थाटण्यासाठी तयार होता.
मात्र नागपूर येथील पिडीत महिला ही विपिनला वारंवार फोन करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पिडीत महिलेने नागपूर येथील कपिल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन संशायित आरोपीस अटक करण्यात आली. नागपूर पोलीसानी या घटनेची माहिती मारेगांव पोलीस स्टेशनला देण्यात आली होती त्या आधारे आरोपीला अटक करून विपिन ला नागपूर पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संपादन-सचिन मेश्राम, यवतमाळ