गावठी हातभट्टीवर मारेगाव पोलिसांचा छापा, ४ जणांना अटक : १२ हजाराची दारू जप्त
१९ जून, सह्याद्री.न्यूज...
मारेगांव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील मोहोफुला पासून गावठी हातभट्टीने दारू तयार करून विक्री करणा-या तिन संशयित आरोपींना मारेगांव पोलिसांनी बुधवार (दि.१७) अटक केली. छाप्या दरम्यान, त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १२ हजार रूपयाची गावठी दारू जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील असलेल्या गोंडबुरांडा मोहोफुलापासून तयार करून परिसरात दारू विक्री करीत असल्याची माहिती मारेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे जमादार विजय कुळमेथे, राहुल ओइबे,शशिकांत वानखेडे, विजय चालख, राजु टेकाम, भगवान चिडे यांनी छापा मारला. यावेळी सत्याग्रह पवार (वय ४२) अनिल पवार (वय ४०) सतीश पवार (वय २६) व दादाराव पवार ( वय ४०) हे चारही ही मोहोफुलची गावठी दारू विक्री करतांना आढळून आले. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून ५ बॅरलसह १२ हजार १०० रूपये किमतीची गावठी दारू जप्त केली असून गावठी दारू विक्री करणा-या चौघांविरूध्द मारेगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मारेगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडळवार यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगांव पोलीस पथकांनी ही यशस्वी कारवाई केली.
संपादन- सचिन मेश्राम, यवतमाळ