WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आर.आर. ढाब्यामध्ये सुरु असलेल्या जुगारावरील धाडित १३ आरोपींना अटक

ImageImage

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- वणी यवतमाळ बायपास मार्गावरील विद्यानगरी परिसरात आर.आर. ढाब्यामध्ये जुगार खेळत असलेल्या १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉकडाऊन काळात छुप्या पद्धतीने घर व मोहल्ल्यात भरविण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या सर्वच प्रकारच्या जुगारांवर धाडी टाकून जुगार खेळणाऱ्यांचे अटक सत्र चालवले असतांनाच जुगारीही शक्कल लढवून अशा गोपनीय ठिकाणी जुगार भरवितात की संशय करण्याची जागाही उरात नाही. परंतु मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वर्तुळावर बारीक नजर ठेऊन असलेल्या पोलिसांनी शहरातील प्रत्येक अपप्रकारांवर आळा घालण्याचे उद्दिष्ट जोपासले आहे. ढाब्यातील जुगारावरील धाड सत्राने जुगार खेळणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

वणी यवतमाळ बायपास राज्य महामार्गावरील विद्यानगरी परिसरातील आर.आर. ढाब्यामध्ये जुगार सुरु असल्याच्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने त्याठिकाणी धड टाकून जुगार खेळत असलेल्या १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्या जवळून रोख ३२ हजार ५०० रुपये, ७ मोबाईल हँडसेट, ५ दुचाकी वाहने, १ चादर व ताश पत्ते असा एकूण ३ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल केशवराव नागतुरे (३२) रा. काजीपुरा, शुभम शंकर टेकाम (२४) रा. चिखलगाव, सुगत किसान पेटकर (२७) रा. जैताई नगर, विजय रामकृष्ण बोधाने (३२) रा. चिखलगाव, अमोल विजय ठाकरे (२६) रा. चिखलगाव, विठ्ठल भिवसन कष्टी (३९) रा. चिखलगाव, निखिल गणेश धारणे (२८) रा. चिखलगाव, गौरव मधुकर टोंगे (२५) रा. विठ्ठलवाडी, दिनेश शेषराव बदखल (३५) रा. बोधेनगर, प्रतीक राजेश्वर चिडे (२२) रा. चिखलगाव, अविनाश विठ्ठलराव सोनुले (२५) रा. जैताई नगर, अक्षय राजेंद्र दडांजे (२२) रा. चिखलगाव, मंगेश रामजी वैद्य (३०) रा. बोधे नगर यांचा समावेश असून यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन करून सोशल डिस्टंनसीन्गचे पालन करता विना मास्क पत्ते खेळतांना आढळल्याने भादंविच्या कलम १८८,२६९ व सहकलम ४,५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे,सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, अमित पोयाम यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share