आणि चक्क बैलबंडीवरच वीज पडली, शेतकऱ्याचा मृत्यू


(घुग्गुस ) येथून चार किमी अंतरावर असलेल्या शेणगाव येथील शेतकरी शंकर संभाजी वैद्य वय 35 वर्ष हा आज शेतीचे कामे आटपुन शेतातून बैल बंडीने घरी जात असताना दुपारी चार वाजता दरम्यान मुसळधार पाऊस पडला व विजा कडाडल्या पावसातच घरी जात असतांना अंगावर वीज पडून शंकरचा जागीच मॄत्यु झाला.
मृतक शंकरला 4 बहिणी 2 मुले पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे.
पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.