WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात ३७ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्ण संख्या ५ वर कायम

ImageImageImage

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-

शहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर त्यांच्या संबंधातील व संपर्कातील व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेतल्या जात असून आतापर्यंत ५९ संशयितांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले असून त्यांचे स्वाब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले होते. ५९ नमुन्यांपैकी ३९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ३७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला असून शहरवासियांमध्ये थोडी भीती तर थोडे समाधान पाहायला मिळत आहे. आणखी २० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ वर कायम आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ व्यक्तींवर नागपूर येथे उपचार सुरु असून २ व्यक्ती वणी येथे संस्थात्मक विलीगीकरणात आहे.

२० जूनला शहरात दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने खबरदारीच्या प्रत्येक उपायांबरोबरच त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे शोधकार्य सुरु केले. त्यानंतर अल्पावधीतच एक आणखी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर २३ जूनला २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या ५ झाली. शोध मोहिमेअंतर्गत २१ जूनला १५ नमुने, २२ जूनला २८, २३ जूनला १६ असे एकूण ५९ संशयित व्यक्तींचे स्वाब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले. त्यापैकी ३९ चाचणी अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर ३७ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वेळीच उपाय योजना केल्याने प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यात काही प्रमाणात यश आले असून नागरिकांमधेही समाधान पाहायला मिळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share