जिल्हाधिकाऱ्यांची वणी शहराला भेट, घेतला परिस्थितीचा आढावा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींपैकी कोणाचेही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले नसल्याने दिवसभर सुरु असलेल्या शहरवासीयांच्या चर्च्यांना पूर्ण विराम मिळाला आहे. विलीगीकरणात असलेल्या ७१ व्यक्तींपैकी ६८ व्यक्तींचे (हायरिस्क) नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले होते. ५८ अहवाल प्राप्त झाले असून ५३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. २ व्यक्तींचे नमुने परत तपासणी करिता पाठवावे लागणार असून बाकी नमुन्यांचे अहवाल अप्राप्त असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
दरम्यान आज गुरुवारी जिल्ह्याधिकारी एम.डी. सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत एसडीओ शरद जावळे, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील महावीर भवन समोरील शांतिपार्क व साईदरबार क्षेत्र तसेच जगन्नाथबाबा मंदिरापासूनचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या क्षेत्राची पाहणी करून नियोजना विषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महावीर भवन येथे २४३ कुटुंब असून तेथील लोकसंख्या ९५३ आहे. आरोग्य विभागाच्या पाच टीम याठिकाणी कार्यरत आहे. तर जगन्नाथबाबा मंदिर परिसरात ९० घरांमध्ये ३५० लोकं रहात असून याठिकाणी चार टीम कार्यरत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची पल्स ऑक्सिमीटर व थर्मल स्क्यानर तपासणी करावी तसेच या क्षेत्रातील आणखी नमुने तपासणी करिता पाठवावे. त्याचप्रमाणे इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करावी. सारी व आयएलआयची लक्षणे असलेल्या नागरिकांची जास्तीतजास्त तपासणी करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व फिझिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. त्यामुळे कोरोनाला रोखने शक्य होईल. शासनाने कोरोनाची रोखथाम करण्याकरिता नेमून दिलेले सर्वच नियम पाळून कोरोनाच्या या लढाईत शासनाला सर्वोतोपरी सहकार्य कारण्याचेआव्हानही त्यांनी आहे. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नारिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन घाबरून जाऊ नये असे आव्हान केले आहे.