३५ लाखांची दारू पोलिसांच्या जाळ्यात, चालक अटकेत
२६ जून,
प्रतिबंधित चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा वाढत आहे. पोलिस विभागाकडूनही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. कोरपना तालुक्यातील नारंडाफाटा रोडवर ट्रक दारू घेऊन जात होता. अशी माहिती मिळाली आणि ट्रक कोरपना पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात कोरपना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकमध्ये १०० बॅग मद्य होते. पोलिसांनी एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी प्रकाश उईके उर्फ लोखंडे याला अटक केली. ही कारवाई ठाणेदार अरुण गुरनुले, वसंत रायसिडाम, प्रकाश निमकर, राम हेक, स्वप्निल बोंडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी विलास यमवार यांनी केली.
संपादन- संतोष पेंदोर