मोबाईल चोरट्याला पोलिसांनी केली अटक, अतिशिघ्र छडा लावल्याचे आणखी एक प्रकरण

प्रशांत चंदनखडे प्रतिनिधी वणी :-
राहत्या घरून मोबाईल व रोखरक्कम चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या कडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू पुरुषोत्तम पोटे (३५) रा. नवीन लालगुडा वणी असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शास्त्रीनगर परिसरातील राहत्या घरून एक मोबाईल व तीन हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार राहुल दिलीप गटेलवार (३२) यांनी २५ जूनला पोलीस स्टेशनला नोंदविली. या तक्रारीवरून डीबी पथकाने तपासकार्य सुरु करून खबऱ्यांकडून माहिती घेत अतिशीघ्र या प्रकरणाचा छडा लावून आरोपी राजू पुरुषोत्तम पोटे यास अटक केली. त्याच्या जवळून नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट व रोख सोळाशे रुपये असा एकूण १० हजार ६०० रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे,सुधीर पांडे, विठ्ठल बुर्रेवार, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवर, अमित पोयाम यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.