अँड. सुरज महारतळे यांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर.....

वकिली करीत सांभाळली शेतीची धुरा :- नवयुवक शेतकऱ्यांना मिळणार संजीवनी ....
वणी :- सुरज चाटे
दिवसागणिक नवीन युवकांच मन शेतीकडे फार कमी वळताना दिसते मात्र वकिली व्यवसाय करीत असताना कृषी क्षेत्रात कार्य करणारे अँड. सुरज वामन महारतळे यांना मुंबई इथे मनुष्यबळ विकास अकादमी " राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२० या कार्यक्रमात " महाराष्ट्र राज्य कृषिरत्न पुरस्कार २०२०" जाहीर झाला असल्याने त्यांनी नवनिर्वाचित शेती करणाऱ्या युवकांना जणू संजीवनीच निर्माण केल्याचे दिसत आहे.
२०१९-२०२० या वर्षात अँड. सुरज महारतळे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आधुनिक शेती या क्षेत्रात काम करून युवकांना प्रेरणा निर्माण केली. त्या माध्यमातून त्यांनी कमी जागेत जास्त उत्पादन कसे करावे हा यशस्वी प्रयोग करून दाखवला. त्यात अर्ध्या एकरा मध्ये ईझरील या पद्धतीने पॉलीहाऊस तयार करून तिथून त्यांनी लाखो चे उत्पादन घेतले होते.
त्या अनुषंगाने येत्या संप्टेंबर महिन्यात मुंबई इथे होत असलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासमेलंन २०२० या कार्यक्रमात सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र बॅच, गौरवमूर्ती मानाचा फेटा देऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या सत्काराने नवनिर्वाचित शेतकरी युवकांना यातून प्रेरणा मिळणार आहे हे मात्र नक्कीच.