शहरात कोरोना नियंत्रणात असून आज १६ पैकी १५ अहवाल आले निगेटिव्ह
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोविड -१९ या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन जवळपास यशस्वी झाले असून १६ पैकी १५ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे जाणवत आहे. २८ जून पासून ३ जून पर्यंतचे सर्वच कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तरीही प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालींवर प्रशासन करडी नजर ठेऊन आहे. या भागातील नागरिकांची आशासेविकांमार्फत नियमित तपासणी करण्यात येत असून वयोवृद्ध व गरोदर महिलांची दिवसांतून दोन वेळा तपासणी केली जाते. आशा सेविकांचे ९ पथक तीनही प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत असून ते अथक परिश्रम घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. प्रत्येकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत असून संशयित व्यक्ती आढळल्यास त्याचे स्वाब घेण्यात येत आहे. प्रतिबंधित परिसरात मोबाईल फिवर क्लीनिकची व्यवस्था करण्यात आली असून सर्वांनी स्वतःहून तपासण्या करण्याचे प्रशासनाने आव्हान केले आहे. प्रशासनाने केलेल्या योग्य उपाययोजनांमुळे सध्यातरी कोरोना आटोक्यात आल्याचे जाणवत आहे.