शहरात आज आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली नऊ
कोरोना परतून येण्यास मुंबई नंतर जळगाव कनेक्शन नडल्याची शहरात जोरदार चर्चा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने कोरोना नियंत्रणात आल्याचे वाटत असतांनाच ४ जुलैला शहरातील एका व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर आज आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली असून ऍक्टिव पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. यापैकी ४ रुग्ण यवतमाळ तर ५ रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरु आहे. कोरोना संसर्गाची रोकथाम करण्यात जवळपास प्रशासन यशस्वी झाल्याचे वाटत असतांनाच नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाने परत एकदा डोके वर काढल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता प्रशासन विविध उपाययोजनांबरोबरच सतर्कतेचा सूचना देतांना शहरातील नागरिकांच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन असतांना देखील नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही चिंतेत पडलं आहे. २८ जून पासून ३ जुलै पर्यंत सर्वच संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जवळपास कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे वाटत असतांना एका व्यापारी युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासियांमध्ये कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. रुग्ण राहत असलेल्या चिखलगाव रोडवरील घरासभोतालचा परिसर सील करण्यात आला असून त्यांचे तहसील कार्यालया समोरील व्यावसायिक प्रतिष्ठानही सील करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर काम करणाऱ्या व घरगुती काम करणाऱ्या जवळपास ३३ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून जवळून संपर्क आलेल्या ( हायरिस्क) व्यक्तींचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात येणार आहे. २० जूनला शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींचे मुंबई कनेक्शन होते तर काल पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीला जळगाव कनेक्शन नडले असल्याचे शहरात बोलल्या जात आहे. अगदी जवळचा नातेवाईक काही दिवसांआधी जळगाव जील्ह्यातून त्यांच्याकडे आल्याचे कळते. एक दोन दिवस सदर नातेवाईक त्यांच्याकडे मुक्कामालाही असल्याचे समजते. त्याच्या काही दिवसांनंतरच या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती अस्वस्थ राहत असल्याचे कळत असून मागील दोन तीन दिवसांपासून शहरातील मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये सदर पॉझिटिव्ह व्यापारी उपचार घेत असल्याचे कळते. प्रकृती स्थिरावत नसल्याने तो नागपूर येथे उपचारासाठी गेला असता त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी कारणात आली व त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरात कोरोनाचा लपंडाव सुरु असून काही दिवसांपर्यंत अदृश्य झाल्यानंतर पुन्हा तो डोके वर काढतो. झरी तालुक्यातील गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तेथील भय इथपर्यंत जाणवू लागल्याने नागरिक आधीच दहशतीत आले असतांना काल शहरातच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरवासीयांचा जीव भांड्यात पडला आहे. शहरातील एक्सपर्ट डॉक्टर झरी येथील पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वाब घेण्यात गुंतले असतांना शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने त्यांची धावपळ चांगलीच वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्व भूमीवर आंतर सीमा बंद असतांनाहि भेटीगाठी करिता हॉसस्पॉट जिल्ह्यांमधून नागरिकांचा प्रवास सुरु असल्याने कोरोनाचे संक्रमण रोखणे कठीण होत आहे. आधी मुंबई तर आता जळगाव कनेक्शन नडल्याचे कळत असून परठिकाणांवरून येणाऱ्यांमुळे कोरोना लागण होत असल्याच्या जनभावना निर्माण झाल्या आहे. काही दिवसांआधी जवळचा नातेवाईक भेटीकरिता येऊन गेल्यानंतर या व्यापारी युवकाची प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्याने पॉझिटिव्ह आढळल्याच्या एक दिवसाआधीपर्यंत शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. शहर व तालुक्यातून मोठ्याप्रमाणात उपचाराकरता याठिकाणी नागरिक येत असतात. त्यामुळे याकाळात याठिकाणी उपचार घेत असलेल्या नागरिकांचीही धाकधूक सुरु आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णाचे व्यावसायिक प्रतिष्ठानही मेनरोडवर असल्याने नेहमी ग्राहकांची रेलचेल सुरु असते. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाचीही डोके दुखी वाढली आहे. प्रशासन त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचे लोकेशन ट्रेस करण्याच्या कामी लागले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.