मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात


प्रशांत चंदनखेडे वणी :-
घरातील खिडकीत ठेऊन असलेला मोबाईल व रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार शास्तीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या व्यक्तीने पोलीस स्टेशनला दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अल्पावधीत छडा लावून आरोपीला अटक केली. त्याच्याजवळून दोन मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजू पुरुषोत्तम पोटे (३५) रा. नवीन लालगुडा वणी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला काही दिवसांआधी अशाच एका मोबाईल चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. शहरातील शास्त्रीनगर परिसरातील घराच्या खिडकीत ठेऊन असलेला मोबाईल हँडसेट व १५०० रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नवाब खान नसीबदार यांनी १ जुलैला वणी पोलीस स्टेशनला नोंदविली डीबी पथकाने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेत अल्पावधीतच प्रकरणाचा छडा लावून राजू पुरुषोत्तम पोटे या आरोपीस अटक केली. त्याच्याजवळून २२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट व ८०० रुपये रोख असा एकूण २२ हजर ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजू पोटे या आरोपीने याआधीही याच परिसरातील राहुल दिलीप गटेलवार यांच्या घराच्या खिडकीत ठेऊन असलेला मोबाईल लंपास केला होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे गोपाळ जाधव, सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली आहे.