WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत आणखी एका व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली 13 !

Image

यवतमाळ, दि. 10: आज जिल्ह्यात 16 नवीन कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन जण ॲन्टीजन चाचणीद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 11 जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तृप्तीनगर येथील एक पुरूष आणि समनानी नगर वडगाव येथील एक पुरुष तसेच तायडे नगर येथील एक महिला असे तीन जण आहेत, दिग्रस शहरातील शंकर नगर येथील एक पुरूष, काझीपुरा येथील चार पुरुष व तीन महिला असे आठ जण आणि दारव्हा येथील दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण आहेत. तसेच ॲन्टीजन चाचणीद्वारे वणी येथील एक आणि भोपाळ येथून एक पॉझेटिव्ह पांढरकवडा येथे स्थलांतरीत झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 101 आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 197 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 16 पॉझेटिव्ह आणि 181 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 120 जण भरती आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 397 वर गेला आहे. यापैकी 283 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 139 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6764 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6471 प्राप्त तर 293 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6076 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

जिल्हाधिका-यांचे आवाहन : पावसाळ्याच्या वातावरणात रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन व्हायरल इन्फक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. वय वर्ष 10 पेक्षा कमी व 60 पेक्षा अधिक असणाऱ्यांनी तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह सारखे आजार असणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. नागरिकांना मागील 5 महिन्यांपासून मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सुचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. त्याचे पालन न करणे ही बाब धोकादायक ठरू शकते.

यापुर्वी यवतमाळ शहर पूर्णत: कोरोनामुक्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्हा देखील कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती, दुकानात 5 पेक्षी कमी नागरिकांना प्रवेश, मास्कचा वापर या शासनाच्या नियमांचे पालन करावे व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share