WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथील स्त्रीलंपट डॉक्टर अद्यापही फरार, अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न अयशस्वी !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

डॉक्टरकीचे एकत्रित शिक्षण घेत असतांना झालेल्या ओळखिचे प्रेमात रूपांतर होऊन नंतर आंतरजातीय विवाह बंधनात बंधलेल्या दोन उच्च शिक्षित जोडप्यांचा अर्ध्यावरच संसार भंगला असून जोडीदारचं स्त्रीभोगी निघाल्याने सहचरणीला पोलिसात धाव घेऊन आपल्या जोडीदाराचे पितळ उघडे पडावे लागले. पुराव्यानिशी डॉक्टर पतीचे परस्रीयांशी असलेले अनैतिक संबंध पोलिसांसमोर उजागर करून विवाहानंतर स्वतःवर झालेल्या शारीरिक व मानसिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक संबंधा करिताही सतत प्रताडित करण्यात येत असल्याची तक्रारही त्या दुर्दैवी पत्नीने आपल्या डॉक्टर पती विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. पोलिसांनी डॉक्टरवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्याला अटक करण्याकरिता पोलीस त्याच्या शोधात असून अद्यापही तो पोलिसांना गवसला नसल्याचे समजते. अटकपूर्व जामिन मिळविण्या करिता डॉक्टरने प्रयत्न चालवले असून त्याला अद्यापही न्यायालयाने जमीन मंजूर केला नसल्याचे समोर आले आहे.

वणी येथील बालरोगतज्ञ डॉक्टर शिरीष मांडेकर यांनी लग्नानंतर आपल्या डॉक्टर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला अनैसर्गिक संबंधा करिता प्रताडित करतांनाच तिच्यापासून फारकत घेण्याचा प्रयत्न चालविला होता. पत्नीला नागपूर येथे राहण्यास बाध्य करून येथे परस्त्रीसुखात रमलेल्या या स्त्रीपीसाट डॉक्टरांचे कारनामे डॉक्टर पत्नीच्या कानावर पडताच तिने वणी येथील स्वतःचे घर गाठत त्याच्या नकळत बेडरूममध्ये कॅमेरा लावला. नंतर कॅमेऱ्यामधील फुटेज पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. वेगवेगळ्या स्त्रियांसोबत डॉक्टर पतीच्या रासलीला पाहुन हादरलेल्या डॉक्टर पत्नीने सरळ नागपूर गाठत २ जुलैला बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये डॉक्टर पतीविरोधात रीतसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी डॉक्टरवर विविध गुन्हे नोंदवून त्याला अटक करण्याकरिता त्याचा शोध सुरु केला. परंतु अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. डॉक्टरने आपल्या वकिला मार्फत अटकपूर्व जमीन मिळविण्याकरिता ६ जुलैला नायालयात अर्ज दाखल केला होता परंतु जमानत नामंजूर झाल्याने नायालयाने ९ व १० जुलै रोजी दोन्ही पक्षकारांना जमातीच्या सुनावणी करीता हजर राहण्यास सांगितले. पण याही तारखांमध्ये जमानतीवर तोडगा न निघाल्याने पुढील सुनावणी करिता १७ तारीख देण्यात आली आहे. ठोस पुरावे, वकिलांची दमदार बाजू व तपासणी अधिकाऱ्यांची साक्ष यामुळे डॉक्टरांचे अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. पीडित डॉक्टर ही उच्चशिक्षित असून एमबीबीएस, डीएमआरई (रेडिओलॉजी) या पदव्या तिने प्राप्त केल्या आहेत. सावंगी येथील मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरकीचे एकत्र शिक्षण घेत असतांना दोघांमध्ये ओळखी झाली. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले व भिन्न जातीतील दोन उच्चशिक्षित व्यक्तींनी आंतरजातीय विवाह करून संसार थाटला. पण विविह झाल्याच्या काही दिवसानंतरच पत्नीची शारीरिक व मानसिक प्रताडना करून तिच्यावर अनैसर्गिक संबंधासाठी सक्ती केल्या जात होती. उच्चशिक्षित बालरोगतज्ञ असलेल्या डॉक्टर व्यक्तीकडून अशाप्रकारची प्रताडना होईल याची कधी कल्पनाही तिने केली नसेल. सर्व अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करत संसाराचा गाढा ओढत असलेल्या पत्नीला नंतर स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्या गेला. पत्नीला नागपूरला पाठवून येथे परस्रीयांशी सलगी करणाऱ्या डॉक्टर शिरीष मांडेकर यांच्या गैरकृत्याचा पत्नीनेच भांडाफोड करून त्यांचं अस्सल रूप समाजापुढे आणलं. रमा नी रमीचा शौकीन असणाऱ्या डॉक्टरचं स्त्रीवेडं रूप समाजापुढे आल्यानंतर शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली. उच्च शिक्षित व्यक्ती चरित्रवान असेलच असे नाही त्यामुळे शिक्षण व चारित्र्याचा कोठेही संबंध येत नसल्याचे जिवंत उदाहरण डॉ. शिरीष मांडेकर यांच्या रूपाने मिळाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share