शहरातील आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली पंधरा!
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून आज आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या आता 15 झाली आहे. सात रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामूळे शहरातील ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. पॉझिटीव्ह महिलेला पुढील उपचारा करीता यवतमाळ येथे पाठविण्यात आलेआहे. शहरात मागिल काही दिवसांत एका मागून एक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढला असून शहरवासीयांमध्येही कमालीची भिती निर्माण झाली आहे. 10 जूनला दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह निघाल्या नंतर आज आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात कोरोना संक्रमणचा वेग वाढला असल्याचे जाणवत आहे. 22 जूनला पहिली कोरोना साखळी निर्माण झाल्या नंतर शहरात कोरोनाचे संक्रमण वाढून आज कोरोनाच्या सहा साखळ्या तयार झाल्या आहेत. कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असून बाधितांचा आकडा 15 वर पोहचला आहे. शहरात कोरोनचा विळखा वाढत असल्याने प्रशासनही चिंतेत आले आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्त्या संक्रमनाणे एकीकडे प्रशासन हादरले आहे तर दुसरीकडे शहरवासीयांमध्ये चांगलीच भिती निर्माण झाली आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचेआव्हान करण्यात आले आहे.