WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनाला वाढू देण्यास नका देऊ संधी, लागू कराना साहेब आता तरी संचारबंदी !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाच्या वाढत्या संक्रमनानं शहर हादरून गेलं आहे. एक एक म्हणता १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शहरात झाली आहे. प्रत्येक दिवस कोरोनाची दहशत घेऊन उगवतो आहे व दहशतीतच मावळतो आहे. कोरोनाचं जाळं पसरतंच चाललंय तुटाचं नाव घेत नाही. एकामागून एक साखळ्या तयार होत आहेत. परिसर सील होत आहेत. एकाची बाधा दुसऱ्याला होत आहे. नियोजन दुबळं पडत आहे, आणखी कोणतं प्रायोजन करावं प्रशासन चिंतीत आहे, उद्या कोण पॉझिटिव्ह निघेल जनतेत धास्ती आहे, शहरात फक्त नी फक्त कोरोनाचीच चालती आहे. निवळेलं का ही साथ, घेता येईल का मोकळा श्वास जनता आता विचारात आहे, की होत राहील अशीच आकड्यांचीच बेरीज प्रश्न त्यांना पडत आहे. रुग्ण होते सात तेंव्हा जनता कर्फ्यू लावू म्हणे, एक दिवस लागला कर्फ्यू, वाद त्यांचे होते जुने, जनता होती राजी पण आडवी आली राजकारणे. कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे, प्रशासनावरील तान वाढू लागला आहे. प्रतिबंधित क्षेत्र वाढून सहा झाली आहे. आरोग्य विभागही चिंतेत पडला आहे, एकीकडे शिवायला गेलं की दुसरीकडे उसवत असल्याने त्यांचीही चांगलीच भंबेरी उडत आहे. आशासेविकांच्या पायात पडघम पडले आहेत, संवेदनशील परिसरातील नागरिकांची तपासणी करणे त्यांचे डेली रुटिंग झाले आहे. कंटेन्टमेंट झोन वाढतच असल्याने त्यांची पायपिटही वाढत आहे. कोरोना सोबत जगण्याची त्यांनी मानसिकता तयार केली असली तरी शहर कोरोनमुक्त करण्याचे धेय्य त्यांनी उराशी बाळगले आहे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला शहर कोरोना मुक्त व्हावे असे वाटत असतांना राजकारणी दिलजमाई का करून घेत नाही हा एकच प्रश्न नागरिकांच्या जहानात बसला आहे. कोरोनाचे राजकारण न करता कोरोनावर मात करण्या करीता राजकारण्यांनी एकत्र यावे हीच अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे. २९ जून ते ३ जुलै पर्यंत लागू करण्यात आलेला जनता कर्फ्यू राजकारणाला बळी चढला. शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्वयंम निर्णय घेत जनहिताकरिता पुकारलेल्या जनता कर्फ्यूला राजकारणाचा रंग दिल्या गेल्याने एकाच दिवसात तो मागे घेण्याची नामुश्की आयोजकांवर आली. आणी ४ जुलैलाच कोरोनाची नवीन साखळी तयार झाली. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर येऊन ठेपली आहे. "साहेब आता तरी शहरात जनता कर्फ्यू लावता का हो" अशी अहार्त हाक जनतेमधुन ऐकायला मिळत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला व त्याचे काटेकोरपणे पालनही करण्यात आले. पांढरकवड्यामध्ये जेमतेम दोन रुग्ण आढळले असतांनाही जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. याठिकाणीही व्यावसायिक बाजारपेठ आहे. त्यांनीही लॉकडाऊनचे चटके सहन केले आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तर १५ ते २० दिवसांपासून जनता कर्फ्यू सुरु आहे. तेथील नागरिकांचेही व्यवसाय उद्योग आहेत. केवळ वणी शहरातील व्यवसायांवरच अवकळा आली असे नाही प्रत्येकचं तालुक्यातील व्यवसायांना बंदचा फटका बसला आहे. तरीही इतर तालुक्यातील पुढाऱ्यांनी जणता कर्फ्यूला पाठिंबा दर्शवित ठरविलेल्या दिवसात कडकडीत बंद पाळला. वणी शहर याला अपवाद ठरले असून बंद मुळे व्यवसाय बाधित होईल या कारणास्तव नागरिक कोरोना बाधित झाले तरी पर्वा न करण्याचे पुढाऱ्यांनी ठामपणे ठरविले असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. पुढाऱ्यांच्या दुमताने प्रशासनही चिंतेत पडले असून त्यांनाही उपाययोजना करण्यास मोकळीक मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात आता "कोणता झेंडा घेऊ हाती" ही परिस्थिती निर्माण झाली असून राजकारणाच्या डावपेचात जनता विनाकारण पिसली जात आहे. शहर कोरोनामुक्त करण्याकरिता आधी कोरोनाची साखळी तोडने आवश्यक असून त्याकरिता शहरातील वर्दळ व दुकानांसमोरील रांगावर नियंत्रण मिळविने गरजेचे आहे. आणि त्याकरिताच जनता कर्फ्यू लागू करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे शहरात उघडपणे बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share