जिल्ह्यात आज १४ जणांना कोरोनाची लागण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’झालेल्या २५ जणांना डिस्चार्ज ; अॅटिव्ह पॉझिटिव्ह संख्या १३९
यवतमाळ,
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतांनाच मंगळवारी २५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ ठरलेल्या या २५ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात आज नव्याने १४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यापैकी आठ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर सहा जण रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत.
आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १४ नागरिकांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिला आहेत. यात पुसद शहरातील संभाजी नगर येथील एक महिला, राम नगर येथील एक पुरुष, रहमत नगर येथील दोन पुरुष, शांती नगर येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक महिला, उमरखेड येथील एक महिला, घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील एकविरा चौक येथील एक पुरुष, यवतमाळ येथील एक पुरुष, दिग्रस येथील दोन पुरुष आणि दारव्हा येथील एक पुरुष व एक महिला पॉझेटिव्ह आहे.
जिल्ह्यात कालपर्यंत (दि.१४) १५० ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात मंगळवारी १४ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १६४ झाला होता. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या २५ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १३९ झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४७६ आहे. यापैकी ३२४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्युची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी ७५ नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने ७१९९ नमुने पाठविले असून यापैकी ७१५६ प्राप्त तर ४३ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ६६८० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.