कोरोना बाधीत महिलेवर क्वारनटाइन सेंटर मध्ये बलात्कार
पनवेलमधील इंडिया बुल या क्वारनटाइन सेंन्टरमध्ये गुरुवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. एका कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. नराधम आरोपीही कोरोना पोसिटीव्ह आहे. आरोपी कोरोना बाधित असल्याने त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे.