WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ओबीसी प्रवर्गाचे नवीनतम लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

राज्यातील आठ जिल्ह्यामध्ये इतर मागासवर्गिय व विभक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील आरक्षणाचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत इतर प्रवर्गापेक्षा कमी असून प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व लोकसंख्येचा विचार करून उपाययोजने करीता गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या कार्यकक्षेत सदर जिल्हांसोबतच महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाची जनगणना करून ती जाहीर करावी तसेच जिल्हास्तरीय सरळ सेवेतील पदांबरोबरच कंत्राटी तत्वावर होणाऱ्या पदांच्या भरतीतही आरक्षणाची तरतूद करण्याची मागणी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन वणी शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली केली आहे.

राज्यातील पालघर,धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या आदिवासी बहुल जिल्ह्यात इतर मागासवर्गीय व वि.जा.भ.ज. या प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत इतर प्रवर्गापेक्षा कमी असून प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व प्रवर्गाची नवीनतम लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हास्तरीय सरळ सेवेची गट-क व गट-ड या संवर्गातील पदे भरण्याकरिता आरक्षण निश्चिती करण्यासंदर्भात उपाययोजना सुचवण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाद्वारे १२ जून रोजी शासन निर्णय क्रमांक बी.बी.सी. २०२०/प्र.क्र. १५३ ऐ /१६-बी नुसार उपसमिती गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ओबीसी प्रवर्गाची नवितम लोकसंख्येची माहिती असणे गरजेचे आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊनही ओबीसी प्रवर्ग ओबीसी बहुल जिल्ह्यातच बेरोजगारीच्या झळा सहन करत आहे. त्यात उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेतलेले सुद्धा बेरोजगार आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त जिल्हा पातळीवर सरळसेवा पदभर्ती व कंत्राटी तत्वावर अनेक पद भरत्या निघत असतात. त्यातही जास्तीत जास्त पद कंत्राटी तत्वावर भरली जातात. त्याकरिता गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या कार्यकक्षेत जिल्ह्या सोबतच महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गाची नवीनतम जनगणना करून ती जाहीर करावी तसेच कंत्राटी तत्वावर भरण्यात येणाऱ्या पद भारतीतही ओबीसी प्रवर्गाला आरक्षण निश्चित करण्यात यावे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय गट-क व गट-ड या संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत उपसमितीच्या कार्यकक्षेत गट-क व गट-ड च्या सरळसेवा पद भरती सोबतच कंत्राटी तत्वावर नियुक्ती करतांना वर्ग अ व ब मध्ये सुद्धा आरक्षण ठेवण्यात येण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रवीण खानझोडे,धनंजय आचरकर, सुधाकर भागवत, वैभव डंभारे, दिलीप गुंजेकार, नितीन वासेकर मोहन हरणे आदींच्या सह्या आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share