शहरातील प्रतिबंधित क्षेत्र सहा मधील २५ पैकी १२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र सहा (तेलीफैल) मधील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २५ संशयित व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १२ नमुन्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असता सर्वच नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १३ नमुने यवतमाळ येथे तपासणी करिता पाठविण्यात आल्याने त्यांचे अहवाल प्रलंबित आहे. कोविड केयर सेंटर मध्ये सध्यास्थितीत १८ जण आहेत. १२ रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहरवासियांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे.
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती २० झाली आहे. ११ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने शहरात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. बाजारात विनाकारण फिरून गर्दी न करता नागरिकांनी कामानिमित्तच बाजारात जाण्याचे आव्हानही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.