जिल्ह्यात 54 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 1 मृत्यू 17 जणांची कोरोनावर मात
यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात आज (दि.22) नव्याने तब्बल 54 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर यवतमाळ शहरातील इस्लामपूरा भागातील 46 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष व 23 महिला आहे. यात नेर शहरातील एक पुरुष, दिग्रस येथील तीन पुरूष व तीन महिला, पुसद येथील 13 पुरुष व नऊ महिला, कळंब येथील दोन पुरूष व दोन महिला, पांढरवकडा येथील 11 पुरूष व सहा महिला, यवतमाळ येथील एक महिला, तर दारव्हा येथील एक पुरूष व दोन महिलांचा महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 151 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात 54 जणांची भर पडल्याने हा आकडा 205 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 17 जणांना सुट्टी झाल्यामुळे व 1 पॉझेटीव्ह रुगणाचा मृत्यू झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 187 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 117 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 70 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 648 झाली आहे. यापैकी 440 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 21 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 77 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 60 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 10554 नमुने पाठविले असून यापैकी 10017 प्राप्त तर 537 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 9369 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात 25 जुलैपासून संपूर्ण लॉकडावून : जिल्ह्यात विशेषत: यवतमाळ शहर व पांढरवकडा शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरील दोन्ही शहरात 25 जुलै पासून समोरचे सात दिवस संपुर्ण लॉकडावून करण्यात येणार आहे. यात दवाखाने व मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील. 25 तारखेपासून सुरू होणाऱ्या या लॉकडावूनमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.