WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यातील रुग्णसंख्या झाली २४ !

ImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तेलीफैल परिसरातील आज आणखी एका युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तेलीफैल परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्र बिंदू बनतांना दिसत असून याठिकाणी नऊ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २४ वर पोहचला आहे. काल २२ जुलैला याच परिसरातील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान सेवाग्राम येथे मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोनाचा ती पहिला बळी ठरली आहे. दाटीवाटीच्या असलेल्या या परिसरात कोरोनाचे एकामागून एक रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेला युवक जत्रा मैदान परिसरातील एका सॉ मिलमध्ये काम करीत असल्याचे समजते. सॉ मिलमधील त्याच्या संपर्कात आलेल्या ५ ते ६ जणांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून कुटुंबातील व परिसरातीलही व्यक्तींना कोविड केयर सेंटरमध्ये हलविले जात आहे. सतत रुग्णांची वाढ होत असल्याने शहरात कोरोना संक्रमणाचा चांगलाच धोका निर्माण झाला असून या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणेच वणी तालुक्यांतही संपूर्ण लॉकडाऊन करता येईल काय, यावरही विचार होणे आता गरजेचे झाले आहे.

शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून या संसर्गजन्य आजाराने ग्रामीण भागातही आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसाआड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात नागरिकांचा मुक्त संचार होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाने तेलीफैल परिसर आपल्या कवेत घेतला असून याठिकाणी कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे, याच परिसरातून कोरोनाने मृत्यू झाल्याची तालुक्यात पहिली नोंद झाली आहे. तालुक्यात २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. शहरातील वाढती वर्दळ व नागरिकांचा मुक्त संचार यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्यास पोषक वातावरण मिळत असून शहरात आता कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना नियंत्रणात राहावा याकरिता संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले असून अशाच प्रकारच्या नियोजनाची शहरात सुद्धा आवश्यकता असल्याचे आता नागरिकांमधून उघडपणे बोलल्या जात आहे. शहरात कोरोना भयावह रूप धारण करण्यापूर्वी कोरोनाचे संक्रमण रोखने आवश्यक असून त्याकरिता शहरातील नागरिकांच्या मुक्त संचारावर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर सकारात्मक विचार करून योग्य नियोजन करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share