WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

काम करा निधी कमी पडू देणार नाही, विकास हेच ध्येय....... ना. अहिर

Image

सुरज चाटे वणीः- या देशातील प्रत्येक कुटुंबाला सन 2022 पर्यंत स्वतःचे घर मिळावे हा आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या देशातील प्रत्येक कुटुंबाला घर देऊन या देशातील गरीबी संपवायची आहे. काम करा निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन दिनांक 6 ला शासकीय मैदान येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर यांनी केली. ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थीना धनादेश वितरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. Image या योजनेअंतर्गत लाभार्थीना धनादेश वाटप करणे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना कायम पट्टया साठी आवश्यक कागदपत्रे देणे. यासाठी आयोजित कार्यक्रमात ना. अहिर धनादेश वितरक म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, विजय चोरडीया, रवी बेलूरकर, पंचायत समिती सभापती लिशाताई विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, बंडू चांदेकर, संघदीप भगत, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. Image या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी करून लाभार्थीची माहिती दिली. मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वणी नगर परिषद क्षेत्रात 1397 घरकुल केंद्र शासनाद्वारे मंजूर होऊन 5 कोटी पेक्षा अधिक निधी मिळाला आहे. अशी माहिती दिली. त्यानंतर आ. राजू तोडसाम यांनी शुभेच्छा पर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. Image या प्रसंगी 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांचा धनादेश वितरण करतांना ना. अहिर पुढे म्हणाले की, या देशातील नरेंद्र मोदी यांचे सरकार जस बोलल त्याच प्रमाणे काम करीत आहे. गरिबांना मोफत घरगुती गॅसची जोडणी दिली. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 1 लाख 31 हजार कुटुंबाना मोफत गॅस जोडणी मिळाली. उजाला योजनेअंतर्गत मोफत वीज जोडणी देण्यात येत आहे. गरीब कुटुंबातील व्यक्तीसाठी 5 लाखापर्यंत वैद्यकीय खर्च शासन करीत आहे. म्हणजे घरकुल, गॅस, वीज व वैद्यकीय खर्चाची चिंता शासन करत आहे. त्यामुळे या देशातील गरिबी हटायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषण करतांना आ. बोदकुरवार म्हणाले की, या दोन वर्षात वणी शहराच्या विकासासाठी 40 कोटींचा भरीव निधी मिळाला आहे. पुढील 3 वर्षात किमान 100 कोटी रुपये या शहराच्या विकासाठी आणू. राज्य शासनाने अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे प्रत्येकांना कायम पट्टे मिळतील असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले. यया कार्यक्रमाला 4 ते 5 हजार नागरिकांची उपस्थिती होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share