शहरात एकाच दिवशी 10 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, रुग्णसंख्या झाली 36
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचे वाटत असतांनाच आज आणखी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला असल्याचे निदर्शनास येत असतांनाच अचानक शहरात 10 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने शहरवासीयांमध्ये चांगलीच भिती निर्मान झाली असून प्रशासनही हादरले आहे. तालुक्यातील राजूर (कॉलरी) नंतर चिखलगाव ग्रामीन क्षेत्रातही कोरोनाने एण्ट्री केली असून वनी - यवतमाळ रोडवरिल रहिवासी असलेल्या कुटुंबातील एक महिला पॉझिटीव्ह निघाली आहे. कोरोनाचे हॉसस्पॉट बनत चाललेल्या तेलीफैल परिसरात सातत्याने पॉझिटीव्ह रुग्ण आढळत असून शहरात एकाच दिवशी 10 रुग्ण आढळल्याने नागरिकांमधे चांगलीच धडकी भरली आहे. एकाच दिवशी 10 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याचा शहरातील हा ऊच्चांक ठरला आहे. त्यामूळे तालुक्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 36 झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 14 झाले आहेत.
शहरातील तेलीफैल परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्र बिन्दू बनला असून हा परिसर कोरोनाचा हॉसस्पॉट बनतांना दिसत आहे. या परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून सतत या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. 26 जुलैला या परिसरातिल महिला व पुरुष कोरोना बाधित निघाल्यानंतर चार दिवसांच्या विश्रांती नंतर आणखी 10 रुग्ण पॉझिटीव्ह निघाल्याने प्रशासन या ठिकानी करित असलेल्या उपाययोजनांचे फलित होतांना दिसत नसुन येथील कोरोनाची साखळी तोडन्याकरिता प्रशासनाला वेगळाच फर्मूला तयार करावा लागणार आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागतही आता कोरोनाने जाळे विणण्यास सुरुवात केली असून राजूर नंतर आता चिखलगावातही कोरोना विषाणूने पाय रोवला आहे. नाशिक येथे गेलेल्या एका व्यवसायिक कुटुंबातील महिला कोरोनाबाधीत निघाल्याने चिखलगाव परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासन एकिकडे कोरोनाची रोकथाम करण्याचा आटोकाट प्रयत्न करित आहे तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने प्रशासनाचे प्रयत्न प्रभावी ठरत नसल्याचे आढळून येत आहे. सातत्याने कोरोबाधीत रुग्ण आढळत असल्याने एकिकडे शिवाव तर दुसरीकडे उसवत असल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे. तरिही प्रशासन कोरोनला नियंत्रणात ठेवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करित असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.