WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आणखी दोन महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली ३८

ImageImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील तेलीफैल परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आज या परिसरातील आणखी एक महिला कोरोना बाधित निघाली आहे. कोरोनाचे हॉसस्पॉट बनलेल्या या परिसरामुळे प्रशासनाची चांगलीच डोके दुखी वाढवतांना दिसत आहे. या परिसरात कोरोनाचा पादुर्भाव चांगलाच वाढला असून या परिसरातील रुग्णांचा आकडाही फुगत चालला आहे. त्याचबरोबर आज राजूर (कॉलरी) येथीलही एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन आणखीच चिंतेत पडले आहे. शहर व तालुक्यात आज दोन नवीन रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३८ वर पोहचली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ झाली आहे.

शहरातील तेलीफैल परिसरातील कोरोनाची साथ काही केल्या आटोक्यात यायचे नाव घेत नसून दिवसागणिक याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. दाटिवाटीची घरे असलेल्या या परिसरात कोरोनाचे संक्रमण अगदीच जलद गतीने वाढतांना दिसत आहे. प्रशासन येथील कोरोनाची साखळी तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतांनाही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडतांना दिसत आहे. तेलीफैल परिसरात आतापर्यंत २२ रुग्णांची नोंद झाली असून ही संख्या वाढतीवरच आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचे जाळे घट्ट होतांना दिसत असून चिखलगाव नंतर लगेचच राजूर (कॉलरी) येथील आणखी एक महिला कोरोना बाधित निघाली आहे. राजूर (कॉलरी) येथे या आधी पॉझिटिव्ह निघालेली महिला कोरोनमुक्त होत नाही तोच आणखी एक महिला पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली असून २३ रुग्ण कोरोनमुक्त तर एका महिलेचा मृत्यू झाल्याने तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आता १४ राहिले आहेत. कोविड केयर सेंटरला ११ रुग्णांवर उपचार सुरु आहे तर ३ रुग्ण यवतमाळ येथे भर्ती आहे. आज ६६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २ महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत तर ६४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १५३ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलीगीकरणात एकूण ८५ व्यक्ती भरती आहेत. तर तालुक्यात एकूण ५ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share