WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आणखी दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त, ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली १३

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहाराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांनाच या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने शहरात समाधान व्यक्त केल्या जात असून प्रशासनाचीही डोकेदुखी कमी झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत २५ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३९ पर्यंत पोहचला आहे.

कोरोना या वैश्वीक महामारीची घनता वाढत असून शहराबरोबरच हा आजार ग्रामीण भागातही बळावला आहे. तालुक्यातील राजूर (कॉलरी), चिखलगाव व घोन्सा या गावांमध्ये कोरोना विषाणूने आपले पाय रोवले असून शहराबरोबरच तालुक्यातही कोरोना विषयीचे नियोजन करतांना आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडत आहे. शहरातील कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू बनलेल्या तेलीफैल परिसरात सातत्याने रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असतांनाच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता आणखीच वाढली आहे. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणेमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. काल २ ऑगस्टला घोन्सा येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती तर आज ३ ऑगस्टला दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २५ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. यापैकी १० रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती आहेत तर ३ रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. आज एकूण ११९ नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून आजचे नमुने पकडून २९६ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलीगीकरणात सध्या ५२ रुग्ण भरती आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share