शहरात विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कार्यवाही
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून या साथीच्या आजाराने ग्रामीण भागातही शिरकाव केल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढून ३९ वर पोहचला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केल्या जात असून आधी १० ते २ वाजेपर्यंत असलेली बाजारपेठेची वेळ बदलवून सकाळी ६ ते साय. ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. बाजारपेठेत नागरिकांची उडणारी झुंबड कोरोना संक्रमणाचे कारण बानू नये म्हणून बाजारपेठेची वेळ वाढविण्यात आली आहे. असे असले तरी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे पाहून वाहतूक पोलिसांनी आज ५ वाजतानंतर विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कार्यवाहीमुळे शहरात विनाकारण गिरक्या मरणाऱ्यांवर चांगलाच चाप बसला असून वेळेनंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आल्याने त्यांच्यात चांगलीच धडकी भरली आहे. वाहतूक पोलिसांनी आज केलेल्या धडक कार्यवाहीने विकारान रस्त्यांवरून गिरक्या मरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून यानंतर अकारण रस्त्यांवर वर्दळ करून रोडची शोभा वाढविणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे आज पोलिसांनी आपल्या कार्यवाहीतून स्पष्ट केले आहे. शहरात एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असतांना दुसरीकडे काही हौसी प्रवृत्तीचे लोक विनाकारण शहरात गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून विनाकारण गिरक्या मरणाऱ्यांवर वचक निर्माण व्हावा म्हणून आज धडक कार्यवाहीचे पोलिसांनी दर्शन घडवून दिले आहे.