WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विद्युत कार्यालयात वीजबिल भरण्याकरिता एकच खिडकी असल्याने लागते लांबलचक रांग

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाच्या या संकट काळात चार महिण्यांची अवाढव्य रक्कमेची वीजबिले घरोघरी धडकल्याने सामान्य जनता आर्थिक विवंचनेत अडकली गेली असली तरी ५० टक्के जनतेने एकदाचे वीजबिल भरून मोकळे होण्याची तयारी दरविल्याने विद्युत कार्यकलायातील विजबिल भरना कक्षा बाहेर बिल भरणाऱ्यांची दररोज लांबलचक रांग लागतांना दिसत आहे. विद्युत विभागाने नागरिकांना वीजबिल भरतांना सुलभता व्हावी याकरिता शहरात ठिकठिकाणी कंत्राटी तत्वावर वीजबिल केंद्र सुरु करून दिली. तसेच पोस्ट व काही बॅंकांमध्येही वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु कोरोना लॉकडाऊन पासून सर्व ई वीजबिल केंद्रे बंद झाली असून वर्दळ निर्माण होईल म्हणून पोस्ट व बँकांनीही वीजबिल स्वीकारणे बंद केले. लॉकडाऊन शिथिल होताच पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवरील ई वीजबिल केंद्र सुरु झाले खरे पण व्यासायिकाच पॉझिटिव्ह निघाल्याने तेही महिन्याभरापासून बंद आहे. त्यामुळे वीजबिल भरण्याकरिता विद्युत कार्यालय हाच एकमेव पर्याय नागरिकांसमोर उरल्याने येथे वीजबिज भरणाऱ्यांची चांगलीच गर्दी उसळतांना दिसते. शहरवासीयांना वीजबिल भरण्याकरिता विद्युत विभागाने एकच खिडकी उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी वीजबिल भरण्याकरिता उसळणारी गर्दी बघता आणखी एक खिडकी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता असतांना विद्युत विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आता तर वीजबिल भरणा कक्षाला लिंक फेलचाही आजार जडला आहे. आज १२.३० वाजताच्या दरम्यान लिंक फेल झाल्याने वीजबिल भरणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. कित्येक तास ताटकळत रांगेत उभे राहिल्यानंतरही लिंक न आल्याने वीज ग्राहकांना निराश होऊन घरी परतावे लागल्याने नागरिक चांगलेच चिडले होते.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्यवसाय,उद्योग, कंपन्या व कारखाने फिजिकल डिस्टंसिंगच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या नोकऱ्या व रोजगार हिरावला गेले. बेरोजगारीच्या खाईत जनता लोटली गेली. रोज मजूरिची कामेही बंद पडली. गाव शहरात बेरोजगारीची छाया गडद झाली. संपूर्ण देशात बेरोजगारीची लाट पसरली. घरातून बाहेर निघण्यावर बंधने लावण्यात आली. कोई रोडपे ना निकाल अशा जाहिराती करण्यात आल्या. घर मे ही रहणा, बहार है कोरोना अशा प्रकारची जनजागृती करून लोकांना घरीच राहण्यास प्रवृत्त केल्या गेले. अजूनही कोरोनाची दहशत कमी झाली नसून कित्येक शहरे प्रतिबंधित क्षेत्रांनी झाकल्या गेली आहे. अद्यापही परिस्थिती पूर्व पदावर आली नसून प्रत्येक जीव जगण्यासाठी संघर्ष करीत असतांना अवाढव्य रक्कमेची वीजबिले सामान्य नागरिकांच्या माथी मारून शासनाने सामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. विद्युत कार्यालयाचे उमरठे झिजवून थकल्यानंतर शासन काही दया करेल व वीजबिल कपात करण्यासंदर्भात काही ठोस निर्णय घेईल, या भोळ्या आशेवर सामान्य जनता शासनाच्या निर्णयाकडे नजरा टिकवून बसली आहे. कोरोनाच्या या संकट काळात सरकार आपल्या पाठीशी आहे, अशा प्रकारे आजही जनतेची बोळवण करण्यात येत असून कोणतीही ठोस मदत अद्यापही शासनाकडून मिळालेली नाही. तरीही संकटाच्या या काळात जगण्याचं बळ निर्माण करत असतांना वीजबिलाचं आर्थिक बर्डन लादून सामान्य नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. अशा या संकट समयी त्यांचे आर्थिक प्रश्न सोडण्या ऐवजी त्यांच्यावर आर्थिक दंड थोपटणे कितपत योग्य ठरेल यावर चिंतन व्हायला हवे.

५० टक्के जनता याही परिस्थितीत वीजबिल भरून मोकळे होण्याच्या तयारीत असतांना त्यांना विद्युत कार्यालयातील वीजबिल कक्षाच्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. वीजबिल भरण्याकरिता एकच खिडकी उपलब्ध असून वीजबिल भरण्या करिता नागरिकांची लांबच लांब रांग लागलेली असते. त्यातल्यात्यात अधामधात लिंक फेलची समस्या निर्माण होत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. घंटो लाईनमध्ये उभे राहून लिंक न आल्याने परत जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची चीड निर्माण होत असून विद्युत विभाग मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. वीजबिल भरतांना एकाच खिडकीवर ग्राहकांची अति गर्दी होत असून वीजबिल भरण्याकरिता आणखी एक खिडकी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share