WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहराची कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल, ३९ पैकी ३२ रुग्ण बरे तर ४४ अहवाल निगेटिव्ह !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची लाट ओसरू लागली असून रुग्ण वाढीवर तूर्तास ब्रेक लागला असल्याने शहरवासियांमध्ये समाधान पाहायला मिळत असून प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकल्याचे दिसून येत आहे. शहरातील तेलीफैल परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखीही वाढली असतांनाच प्रशासनाने फार्मुला बी तयार करून या परिसरावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केल्याने सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातीलही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये योग्य उपाययोजना केल्यामुळे रुग्णवाढीवर नियंत्रण मिळविता आले. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक असून आणखी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ वर आली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच ग्रामीण भागातही कोरोनाच जाळं तयार होऊ लागल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढू लागली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही नियोजनात्मक उपाययोजना करतांना प्रशासनाची चांगलीच धावपळ होत होती. अशाही परिस्थिती गोंधळून न जाता प्रशासनाने फार्मुला बी तयार करून कोरोना प्रतिबंधित क्षेत्रावर बारीक नजर ठेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पोलिसांचा पहारा कडक करून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन योग्य त्या उपाययोजना केल्याने शहर व तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ असून त्यातील ३२ रुग्ण कोरोनातून ठणठणीत बरे झाले तर एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ वर आली आहे. आज ४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून पूर्ण निगेटिव्ह आले आहेत. अजून ३०३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. तालुक्यात ४ कंटेन्टमेंट झोन ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी शहरात एक तर ग्रामीण भागात ३ कंटेन्टमेंट झोन आहेत. सहा ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन कोविड केयर सेंटरमध्ये तर तीन यवतमाळ येथे उपचार घेत आहेत. शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून शहरात शेवटचा रुग्ण १ ऑस्टला तेलिफैलात आढळला होता. तर ग्रामीण भागात २ ऑगस्टला घोन्सा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा ३९ वर स्थिरावला आहे. प्रशासनाच्या एकूणच नियोजनबद्ध पद्धतीमुळे कोरोनाची संख्या सुरुवातीपासूनच नियंत्रणात राहिली आहे. कोरोनाचा उद्रेक अद्याप तरी शहरात झालेला नसून याचे श्रेय शहर प्रशासन, आरोग्य प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्या समयसूचक कार्यप्रणालीला जाते. या तीनही प्रशासनांनी शहर व तालुक्यातील कोरोनाची योग्य परिस्थिती हाताळून वेगवेगळे उपाययोजनात्मक प्रयोग केल्याने कोरोना संक्रमणाला उग्ररूप धारण करता आले नाही. त्याचे एकूणच समाधान शहरवासीयांच्या चेहऱ्यांवर झळकत आहे. आता कोरोनमुक्त शहर होण्याची वाट जनता बघत असून त्यांची स्वप्नपूर्ती होण्याकरिता तीन पाऊल पुढे सरकने बाकी राहिले आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केल्याने शहर कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करीत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share