तालुका कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर, एकच उरला ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून मागील आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात कुणालाही कोरोनाची लागण न झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील चिखलगाव हद्दीत येणाऱ्या मंगलम पार्क येथील २० वर्षीय तरुणाचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून २५ जुलै पासून तो शासकीय रुग्णालयात भरती होता. त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. नंतर त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतांना आणखी त्या तरुणाची ८ ऑगस्टला रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला व १० ऑगस्टला त्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील सर्वच लोकांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील चिखलगांव येथील पॉझिटिव्ह तरुणाच्या मृत्यूने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ झाली असून मृतांची संख्या दोन झाली आहे. तालुक्यातील आज आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आता एकच उरला आहे.
कोरोना या साथीच्या रोगाने सर्वत्र थैमान घातले असतांना तालुक्यात मात्र प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाची साथ बरीच आटोक्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने कोरोनाची साखळी तुटली असल्याचे सध्या तरी जाणवत आहे. शहर व तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर रोख लागल्याने शहरविसीयांमध्ये समाधान पाहायला मिळत असून प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. चिखलगाव येथील मंगलम पार्क मध्ये राहणारा २० वर्षीय तरुण २५ जुलै पासून शासकीय रुग्णालयात भर्ती होता. त्याठिकाणी त्याची कोरोना टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला नागपूर येथीलच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असतांना ८ ऑगस्टला त्याची रॅपिड अँटीजेन द्वारे कोरोना तपासणी केली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर १० ऑगस्टला उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली असून १० जुलैला सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह निघालेल्या तेलीफैलातील महिलेचा उपचारादरम्यान २२ जुलैला मृत्यू झाला होता. तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ झाली असून ३८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आता एकच उरला आहे. आज ९२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. ११२ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आज ४४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्याचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण २९२ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूणच शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून तालुका कोरोनामुक्त होण्याच्या एक पाऊल दूर आहे. नागरिकांनी सावधानी बाळगून कोरोनाला पसरू न देण्यास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.