शहरातील रजानगर येथे बाहेरून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण ?
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यातून परतीच्या मार्गावर आलेला कोरोना शहरात पुन्हा एकदा सक्रिय होतांना दिसत असून काही दिवसांपूर्वी परप्रांतातून शहरातील रजानगर येथे आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. बाहेरून आल्यापासून तो क्वारंटाईन मध्ये असून चार दिवसांआधी त्याच्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता काल रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. रात्रीच त्याला व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविल्याचे समजते. तर परिवारातील अन्य सदस्यांना होम क्वारंटाईन केल्याचे कळते. सदर व्यक्तीच्या पॉझिटिव्ह येण्याला दुजोरा मिळाल्यास कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४८ होईल तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर पोहचेल.
विशाखापटणम येथून ईदनिमित्त शहरातील रजानगर येथे आपल्या नातेवाईकाकडे आलेल्या एका व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी त्या व्यक्तीमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्याचे स्वाब तपासणी करिता पाठवण्यात आले होते. काल रात्री उशिरा त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. काल रात्रीच त्याला व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले तर परिवारातील अन्य सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सादर व्यक्तीच्या पॉझिटिव्ह येण्याला दुजोरा मिळाल्यास पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ होईल. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आठ होईल. रजानगर येथे विरळ वस्ती असल्याने अद्याप त्या भागाला सील करण्यात आले नाही. प्रशासन या भागावर लक्ष ठेऊन असून याठिकाणी खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना केल्या जातात लवकरच स्पष्ट होईल.