WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोंड पंच कमिटीच्या राखीव जागेवर उभारले राजीव गांधी भवन, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तयार केले खोटे दस्ताऐवज !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

झरी तालुक्यातील माथार्जुन गावातील गोंड पंच कमिटीच्या राखीव जागेवर ग्रामपंचायते कडून जाणीवपूर्वक राजीव गांधी भवन (सचिवालय) उभारण्यात आल्याची तक्रार माथार्जुन येथील सुजाण नागरिक योगेश मडावी यांनी झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात केली असून तक्रारीची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.

माथार्जुन या २१८३ लोकसंख्या असलेल्या गावात आदिवासी समाजाची बरीच घरे आहेत. याठिकाणी गोंड पंच कमिटीची राखीव जागा असून ही जागा आदिवासी बांधवांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याकरिता आरक्षित करण्यात आली असून याठिकाणी ग्रामपंचायतेच्या पदाधिकाऱ्यांनी संगमत करून राजीव गांधी भवन उभारले आहे. राजीव गांधी भवन हे शासकीय जागेवर बांधण्याऐवजी कमेटीच्या आरक्षित जागेवर बांधून ही जागा परस्पर हस्तगत करण्याचा डाव ग्रामपंचायतेचे पदाधिकारी साधत आहे. शासनाकडे या जागेचे खोटे दस्ताऐवज सादर करून या जागेवर राजीव गांधी भवन (सचिवालय) माथार्जुन असे नामकरण असणारी इमारत बांधण्यात आली आहे. राखीव जागेचे खोटे दस्ताऐवज सादर करून शासनाची दिशाभूल करीत अनाधिकृत इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ग्रामपंचायतेच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार वजा मागणी मडावी यांनी केली आहे. खोटे दस्ताऐवज तयार करून आदिवासींची राखीव जागा हडपण्याचा प्रयत्न तत्कालीन ग्रामपंचायतेच्या पदाधिकाऱ्यांनी चालविला असून राजीव गांधी भावनांची इमारत हा फक्त देखावा असल्याचे मडावी यांनी तक्रारीत म्हटले आहे. ग्राम "पेसा" अंतर्गत येत असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये आदिवासी समाजाचे बहुसंख्य लोकं आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी पद उपभोगत असतांना या पदाचा दुरुपयोग करून आरक्षित जागेची विल्हेवाट लावण्याचा कुटील डाव पदाधिकाऱ्यांकडून खेळल्या जात आहे. तेंव्हा या गोंड पंच कमिटीच्या जागेवर उभारलेल्या राजीव गांधी भवनाच्या अनाधिकृत बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर समाजाची जागा हडपल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी योगेश मडावी यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share