WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आठ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली ५५ !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असतांनाच एकाएक रुग्ण वाढीचा आलेख वाढू लागल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. परतीच्या वाटेवर असलेला कोरोना परत एकदा सक्रिय झाल्याने प्रशासनावरील तान वाढला आहे. शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतीवर लागली असून आज शहरात आणखी ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचे हॉसस्पॉट बनलेल्या तेलीफैल परिसरातील ५ तर रजानगर येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून चिंचोली (कोलगाव) येथे नव्यानेच २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५५ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे. आज एकूण ९६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ९० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ३४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यात २ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ३२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत ४५४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. एकूण ७७ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात भरती आहेत. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. त्यापैकी ३८ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे. त्यापैकी १४ रुग्णांवर कोविड केयर सेंटर येथे उपचार सुरु असून १ रुग्ण यवतमाळ येथे भरती आहे.

शहर व तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर रोख लागली असतांनाच या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढल्याने तालुक्यात एकच सक्रिय रुग्ण उरला होता. तो ही १७ दिवसांपासून जामीन न मिळाल्याने यवतमाळ कारागृहात होता. १ ऑगष्टला तेली फैलात शेवटचा रुग्ण आढळून आला तर २ ऑगस्टला तालुक्यातील घोन्सा येथे एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर ब्रेक लागल्याने कोरोनाच्या सर्वच साखळ्या तुटल्यागत वाटत असतांना तब्बल १० दिवसानंतर ११ ऑगस्टला एकाएक तालुक्यात कोरोनाचे ६ रुग्ण आढळले. त्यात शहरातील हॉसस्पॉट झोन मधील डॉक्टरांचा समावेश होता. आज १३ ऑगष्टला आणखी ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तेलीफैल या हॉसस्पॉट झोन मधील ५ व्यक्तींचा समावेश आहे. तर चिंचोली (कोलगाव) येथील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने याठिकाणी कोरोनाची नवीन साखळी तयार झाली आहे. तसेच रजानगर येथे बाहेरून आलेला व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने याठिकाणीही कोरोनाची नवीन साखळी तयार झाली आहे. ईद निमित्त विशाखापटणम येथून नातेवाईकांकडे आलेला व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे हॉसस्पॉट बनलेल्या तेलीफैल परिसरात १० जुलै पासून तर १३ ऑगष्ट पर्यंत एकूण २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share