शहरातील सहा व्यक्तींना झाली कोरोनाची लागण, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली ६२
प्रशांत चंदनखेडे वणी :-
यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या शहरातील शास्त्रीनगर येथील एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर रजानगर येथील तीन पुरुष व दोन महिला पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ झाली आहे. आज एकूण १३ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ८ निगेटिव्ह तर ५ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २७ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७०६ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर ११०२ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. शास्त्रीनगर येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील व संपर्कातील १३ सदस्यांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून तो राहत असलेला १५० मीटर परिसर सील करण्यात आला आहे.
शहरातील रजानगर येथील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतांना दिसत असून कालच येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दक्षिण प्रांतातून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर रजानगर येथे नव्याने कोरोनाची साखळी तयार झाली. या परिसरात आतापर्यंत सात रुग्णांची नोंद झाली आहे. तेलीफैल नंतर रुग्ण वाढीस लागणारा हा दुसरा परिसर आहे. तसेच शास्त्रीनगर येथेही कोरोनाची नवीन साखळी तयार झाली असून यवतमाळ येथे १३ जुलैला उपचाराकरिता गेलेल्या पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील १३ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात येऊन त्यांचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. त्याच बरोबर पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला शास्त्रीनगर येथील १५० मीटर पर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. आज नवीन ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ६२ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णानाची संख्या ११ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतांनाच त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याने प्रशासनामध्ये थोडे समाधान तर थोडा तान वाढतांना दिसत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची योग्य खबरदारी घेण्याबरोबरच कोविड केयर सेंटरमध्ये भरती असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचीही योग्यरीत्या काळजी घेण्यात येत असल्याने शहरातील कोरोनाच्या साथिवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन यशस्वी ठरत आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे योग्य पालन करून कोरोनाचा नायनाट करण्याकरिता प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.