WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आणखी नऊ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, रुग्ण संख्या झाली 90

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती वाढतांना दिसत असून कोरोना बाधितांचा आकडाही दिवसागणीक वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच असून प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. आज आणखी 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढून 90 झाला आहे, तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 37 झाली आहे. आज सात नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सातही अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच आज २६ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली, त्यापैकी २ पॉझिटीव्ह तर २४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ९० पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ५१ रुग्ण कोरोनमूक्त झाले असून २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून दिवसागनिक कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहे. आता पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून पोलीसांनिही कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. शास्त्रीनगरमधेही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तेलीफैल नंतर रजानगर व शास्त्रीनगर येथील रुग्ण वाढतांना दिसत आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमधे शास्त्रीनगर येथील 4, शिंदोला येथील एक, वरद अपार्टमेन्ट येथिल एक, चिंचोली (कोलगाव) येथील एक, चिंतामणी अपार्टमेन्ट येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या ९ रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९० झाली असून ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share