WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील आणखी पाच व्यक्तींना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या झाली 95

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या उचांक गाठतांना दिसत आहे. तालुक्यात कोरोना विषाणूने कहर केल्याचे जणवत असून आज आणखी पाच व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्याने तालुक्यातील पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 95 झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 42 झाली आहे. आज एकुण 28 तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असुन त्यापैकी 5 पॉसिटीव्ह तर 23 नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज आणखी 28 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल तपासणी करिता पाठविण्यात आल्याणे 63 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहे. आज सात व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्या सर्वांचे रेपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकुण 1031 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत, तर 1285 व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. 95 पॉसिटीव्ह रुग्णांपैकी 51 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 42 झाली आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतांना दिसत असून दिवसांगनिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली आहे. तालुक्यात पॉसिटीव्ह रुग्णांची मालिकाच सुरू झाली असून शहरातील वेगवेगळ्या परिसरात आता पॉसिटीव्ह रुग्ण आढळत आहे. तालुक्यातील एकामागून एक गाव खेडेही कोरोनाच्या सावटात येतांना दिसत आहे. आज एकुण पाच पॉसिटीव्ह रुग्ण आढळले त्यामध्ये शिंदोला येथील एक पुरुष, वसंत विहार येथील तिन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. वसंत विहार येथील रुग्णही वाढतांना दिसत आहे. ऍक्टिव्ह पॉसिटीव्ह रुग्णांपैकी 37 रुग्णांवर कोविड केयर सेंटर मध्ये उपचार सुरू असून 5 रुग्णांना यवतमाळला हलविण्यात आले आहे. कोविड केयर सेंटरमध्ये एकुण 85 व्यक्ती भरती आहेत. एकुण 14 कंटेनमेंट झोन ऍक्टिव्ह असून 5 शहरात तर 9 ग्रामीण भागात आहेत. तालुक्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 95 झाली असून 51 रुग्ण कोरोनामूक्त झाले आहे, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 42 झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share