WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी आगाराची आंतरजिल्हा बस वाहतूक वाढविण्या संदर्भात उदासीन भुमिका!

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध लादन्यात आले. मैट्रो ट्रेन व रेल्वे प्रवसी वाहतुकीसह राज्यातील बस सेवाही कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या. परंतू टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर आधी जिल्ह्यंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली. तर वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलना नंतर 20 ऑगस्ट पासुन राज्य परिवहन महामंडळाची आंतर जिल्हा प्रवासी वाहतूकही चालू करण्यात आली. परंतू नागरिकांना त्याचा फारसा लाभ मिळतांना दिसत नसुन दिर्घकाळ विश्रांती नंतरही एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी वर्गाची मानसिकतेत जराही बदल झाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतर जिल्हा बसेस सुरू करण्यामागे शासनाचा नागरिकांना पर जिल्ह्यात महत्वपूर्ण कामा करिता जाण्यास अडचण निर्माण होणार नाही व एसटी महामंडळाची आर्थिक स्थितीही काही प्रमाणात बळकट होइल हा हेतू होता. पण एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी शासनाच्या धोरणाची अमलबजावनी करतांना दिसत नसुन त्यांचा आंतर जिल्यात बसफेऱ्या वाढविण्याबाबत जराही रस दिसत नसल्याचे एकुणच चित्र पहायला मिळत आहे. एसटी चे उत्पन्न वाढविण्यास शासन वेगवेगळे प्रयोग करित असले तरी येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाची नेहमी उदासीन भुमिका राहिली आहे. आपल्या ड्यूटीच्या तासिका कशा पुर्ण होइल हिच त्यांची मानसिकता आधीही होती व आताही पहायला मिळत आहे. आळशी प्रवृत्ती त्यांनी कधी झटकण्याचा प्रयत्नच केला नाही. आधी हात दाखवुनही टप्प्यावर कधी बस न थांबवणे, बस स्थानकाबाहेर निघाल्यानंतर प्रवासी न घेणे या महामंडळाच्या कर्मचारी वर्गाच्या मानसिकतेमुळे खाजगी वाहतुकीला चालना मिळत गेली. आधी आठ ते दहा किंवा त्यापेक्षाही कमी प्रवासी घेऊन बस धावायच्या पण आता 18 प्रवासी असतांना देखील आंतर जिल्हा बस चालविण्यास अधिकारी वर्ग साफ नकार देत आहे. त्यामूळे शासनाने अमलात आणलेल्या महामंडळाच्या आर्थिक बळकटीच्या संकल्पनेला तळा जात असल्याचे पहायला मिळत आहे. वणी वरोरा बस फेऱ्यावरच वणी आगाराचा जोर असल्याचे पाहायला मिळत आहे. एक वरोरा फेरी न्यायची व तिकडंन परत फेरी आणायची यातच कामाच्या तासिका पुर्ण होत असल्याने कशाला दुर जायचे ही वणी डेपोच्या कर्मचारी वर्गाची मानसिकता अधिकारी वर्गामुळे निर्माण झाली आहे. 20 ऑगस्ट पासुन दोन ते तिनच फेऱ्या नागपूरच्या झाल्या आहेत. अधिकारी कारनं सांगतात प्रवासी मिळत नाही. मुळात येथील कर्मचाऱ्यांच्या जिव्हळी लागत आहे लांब पल्यावर जणं.

वणी एसटी डेपो मधून नागपुर करिता आता पर्यंत तिन फेऱ्या गेल्या आहेत. नागपूरचे प्रवासी मिळुनही त्यांना वरोरा येथे उतरविल्या जातं. अधिकारी कर्मचारी यांना विनवणी करुनही नागपुर येथे बस नेण्यास साफ नकार देण्यात येतो. प्रवासी देवोभव हे ब्रीद वाक्य जोपासणारे एसटी महामंडळ कामचुकारु कर्मचारी वर्गामुळे मलिन होतांना दिसत आहे.

आज 22 ऑगस्टला 11 वाजता वणी बस स्थानकावर नागपुर करीता बस लागली. या बसमध्ये नागपूरला जाणारे 8 ते 9 प्रवासी होते. पण येथील अधिकारी वर्गाने बसला वरोरा पर्यंतच जाण्याची अनुमती दिली. वरोरा येथे बस पोहचल्या नंतर त्याठिकाणी नागपुर येथे जाणारे 18 ते 19 प्रवासी जुळले. त्यानंतर वरोरा आगाराचे बस स्थानक प्रमुख यांना प्रवाशांनी विनंती केली की नागपुर करिता बसची व्यवस्था करा. पण त्यांनी बस उपलब्ध नसल्याचे कारन सांगून साफ नकार दिला. नंतर वणी आगाराचे बस स्थानक प्रमुख यांना फोन करुन विनंती केली की, वरोरा येथे आलेली बस नागपुर पर्यंत पाठवावी. आवश्यक असलेल्या 22 सीटचे पैसेही प्रवासी आपसात जुळवुन द्यायला तयार होते. पण चालक वाहकांच्या सांगण्यात येउन बस स्थानक प्रमुखांनी बस नागपुर पर्यंत नेण्यास असमर्थता दर्शविली. या प्रवाशांमधे कोणाचा नोकरीचा इंटरव्ह्यू होता, कोणाचे लग्नकार्य होते, कोणाला अभ्यासक्रमाकरता प्रवेश घ्यायचा होता तर कोणाला आपल्या आजारग्रस्त नातेवाईकाची आखरी भेट घ्यायची होती. पण महामंडळाचे अधिकारी कुणालाही जुमानत नव्हते. त्यांच्यातली मानुसकी पूर्णता लोप पावली असल्याचे जणवत होते. शासनाने विनाकारण प्रवासी वाहतुक सुरू केली, आपल्याला तर पगार मिळत होता ना, अशी भावना त्यांच्यातून उमटत होती. आत्राम बाबू म्हणले होते की, 15 ते 16 प्रवासी असले तरी बस सोडण्यात येते, सकाळी सात वाजता 16 प्रवाशांना घेऊन नागपूरला बस गेल्याचेही त्यांनी सांगितले. पण वणी आगाराचे बस स्थानक प्रमुख व त्यांना कानमन्त्र देणारे चालक वाहक यांनी 22 प्रवासी शोधून आना तेंव्हाच बस जाग्यावरुन हलेल अशी ताठर भुमिका घेतल्याने विनवणी करनाऱ्या प्रवाशांची घोर निराशा झाली व ते तीन ते चार तासांच्या बसच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळेल त्या वाहतुकीच्या साधनांनी नागपुरकडे रवाना झाले. शेवटी अशीच कुचंबणा करायची होती तर एसटी चालूच कशाला केली, या संतप्त भावना नागरिकांमधून ऐकायला मिळत होत्या. या अधिकारी कर्मचारी वर्गावर कोणाचेही नियंत्रण न उरल्याने यांची मनमर्जी सुरू असल्याचेही नागरिक उघडपणे बोलतांना दिसत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share