WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण, रुग्ण संख्या झाली 96

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना या साथीच्या रोगाने शहर व तालुक्यात परत एकदा धुमाकूळ घातला असून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत आहे. शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत असल्याने येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. लोप पावलेली कोरोना संक्रमणाची गती चांगलीच वाढली असल्याने प्रशासना बरोबरच नागरिकही चिंतेत आले आहे. सण उस्तवांबरोबरच दैनंदिन जिवनावरही कोरोनाने विरजण आणल्याने नागरिकांमधे कमालीचे नैराश्य पसरले आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढत असून कोरोना रुग्णांचे तालुक्यात शतक होण्यास चारच रुग्ण कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. आज शहरातील गुरु नगर परिसरातील कोळसा खदानीतील व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने पॉझिटीव्ह रुग्णांची सख्या 96 झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 35 झाली आहे. तालुक्यातील आठ रुग्ण आज कोरोनातून पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आज आणखी 22 व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने 85 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.

आज एकुण 28 व्यक्तींची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली असून यामधे एक व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आला तर 27 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आता पर्यंत 1059 रॅपिड अँटीजन चाचण्या करण्यात आल्या असून 1307 व्यक्तींची आरटी-पिसिआर स्वाब तपासणी करण्यात आली आहे. शहर व तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण होतांना दिसत असून प्रशासनावरील तानही चांगलाच वाढला आहे. प्रशासनाने योग्य फिलडिंग लावल्याने ऑल आउट होण्यास एक विकेट बाकी राहिली असतांना कोरोनाने परत आपला डाव साधत शहराच्या चौफ़ेर संक्रमण करत शतक झळकविन्याकडे वाटचाल केली आहे. कोरोनाच्या लगातार फटकेबाजीने आरोग्य विभागाची टिम चांगलीच दडपणात आली असून कोरोनाच्या फटकेबाजीपुढे त्यांच्या उपाययोजनांचा मारा निष्प्रभ ठरत आहे. तरिही प्रशसनाच्या उत्तम कामगिरीमुळे आज कोरोनाचे आठ रुग्ण बरे झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानेही विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. आज एक रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची सख्या 96 झाली असून 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 35 झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 29 रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून 6 रुग्णांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. एकुण 80 व्यक्ती कोविड केयर सेंटरला भरती आहेत. गुरु नगर येथील कोळसा खदानीतील कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्याने खदानीतील कर्मचाऱ्यांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share