तालुक्यात कोरोनाचा धमका, एकाच दिवशी 18 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या झाली 114
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत असून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांनी तालुक्यात 100 चा आकडा पार केला आहे. कोरोनाचे संक्रमण तिव्र गतीने वाढत असून शहर व तालुक्यात दिवसा गनिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. आज तालुक्यात एकाच दिवशी 18 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून हा आज पर्यंतचा तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्णांचा एका दिवसातील उचांक ठरला आहे. आज आढळलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 114 झाली आहे. तर ऍक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 53 झाली आहे.
आज एकुण 35 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 15 पॉझिटीव्ह तर 20 नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. तसेच आज 27 व्यक्तींची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली, त्यापैकी 3 पॉझिटीव्ह तर 24 व्यक्तींचे रीपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 1076 रॅपिड़ अँटीजन टेस्ट करण्यात आल्या तर 1333 व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी 25 व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने 75 अहवाल प्रलंबित झाले आहेत. कोविड केयर सेंटरला सध्यास्थितीत 80 व्यक्तीना कॉरंटाईन ठेवण्यात आले आहे. 114 रुग्णांपैकी 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 53 झाली आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 11 पुरुष व 7 महिला आहेत. त्यामध्ये रंगारीपुरा येथील 9, गणेशपूर येथील कातकडे ले-आउट मधिल 4, चिंचोली (कोलगाव) येथील 1, सिंधी कॉलनी येथील 1, गणेशपूर येथिल 2, सानेगुरुजी चौक येथील एका व्यक्तिचा समावेश आहे. पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असून कोरोनाने रुग्णांचे शतक पार केले आहे.शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढतदिसत असून प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली आहे. शहरातील वेगवेगळ्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णांची व परिसरातील नागरिकांची कळजी वाहतांना आरोग्य विभगची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात उपाययोजना करतांना प्रशासनाचीही तारांबळ उडतांना दिसत आहे. नागरिक शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतांना दिसत नसुन सार्वजनीक ठिकानी वावरतांणा योग्य ती दक्षता घेत नसल्याचे नेहमीच पाहायला मिळत आहे. त्यामूळे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना प्रशासनाला चांगल्याच अडचणी निर्माण होतांना दिसत आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात ठेवण्या करिता नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची त्यांच्याकडून प्रशासनाला अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरिता एकजुटीची आवश्यक्ता असून प्रशासनाच्या गाईड लाईन्स नागरिकांनी समजून घेण्याची आज नितांत आवश्यक्ता आहे. कोरोना रुग्णांचा आलेख वाढायला लागला असून कोरोना विस्फ़ोटाच्या मार्गावर आहे. तेंव्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही योग्य प्रतिसाद देण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.