WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज सतरा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या झाली १४८

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यातील कोरोनाचं संकट गडद होतांना दिसत असून मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. निवळत आलेली कोरोनाची साथ परत सक्रीय होऊन उग्र रूप धारण करू लागली आहे. शहर व तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अगदीच तीव्र गतीने वाढत असून प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जनता चांगलीच भयभीत झाली आहे. आज आणखी १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १४८ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ८७ झाली आहे.

शहरात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत असून शहर वासियां बरोबरच पोलीस व डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होतांना दिसत आहे. कोविड योद्धेच आता कोरोनाग्रस्त होऊ लागल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सहा नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर ११ जणांचे रॅपिड अँटीजेन चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पटवारी कॉलनीतील दोन, काळे लेआऊट मधील दोन, रंगारी पुरा एक, एस बी लॉन परिसरातील एक, रवी नगर एक, रंगनाथ नगर मधील एक, उकनी येथील एक, जैन लेआऊट मधील एक, जत्रा रोड एक, सिंधी कॉलनीतील पाच, भाल्लर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सतत आढळणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांमुळे प्रशासनही चिंतेत आले असून उपाय योजना करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आरोग्य यंत्रणाही हतबल झाली असून सततच्या धावपळीने, त्यांच्या वरही चांगलाच ताण वाढल्याचे दिसत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी जनसंपर्क टाळून आवश्यक नसल्यास घराबाहेर पळण्याचे टाळावे तसेच स्वतःची व परिवाराची योग्य दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share