सण उस्तवांच्या काळात आवश्यक वस्तूंचे भाव वधारले
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सार्वजनीक उस्तव सोहळ्यांवर निर्बंध घातल्या गेल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण आले असतांनाच हंगामी व्यावसायिकांनाही लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला व बसत आहे. काही व्यवसायिकांचा हंगाम लॉकडाऊनला बळी चढला आहे. तर काही हंगामी व्यावसायिकांना अजुनही लॉकडाऊनचा फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामूळे आता ज्या सण उस्तवात ज्या वस्तूंची जास्त मागणी असते, त्या वस्तूंचे भाव दुपटिने वाढविण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सण उस्तवांचा काळ सुरू झाला असून प्रत्येक सनाला एका विशिष्ट वस्तूचं महत्व प्राप्त आहे. सध्या गणेशोस्तवाचा काळ सुरू असून हार फुलांना या काळात चांगलीच मागणी असते. नेमकी हिच संधी साधून फुलहार विक्रेत्यांनी हारांची किमत दुपटिने वाढविली असल्याने आधिच आर्थिक झळा सोसत असलेल्या सामान्य वर्गाला गणेशोस्तवाचा आनंदही हारा वाचुन फुलावरच साजरा करण्याची वेळ आली आहे. गणरायाची स्थापना होण्याच्या दोन दिवस आधी 10 रुपयांना मिळणारा फुलांचा हार स्थापना दिनी 30 रुपयांवर जाऊन पोहचला. यावरुन प्रत्येकांचा एक दिवस जरुर येतो, हे लक्षात येत असले तरी याचा भुरदंड सामान्य जनतेलाच सहन करावा लगतो हे ही तेवढेच खरे आहे.
कोरोनाच्या दहशतीत सुरवातीच्या दोन तीन महिन्यांचा काळ घरातच बसुन दिवस मोजण्यात गेला. कालांतराने लॉकडाऊन मधून शिथिलता मिळत गेल्यानंतर उध्योग, व्यवसाय, कामधंदे सुरू झाले खरे पण पाहिजे त्या प्रमाणात त्यांना चालना मिळाली नाही. लॉकडाऊन काळात हजारो लोकांचा रोजगार हिरावल्या गेल्याने बेरोजगारीच संकट गडद होत गेलं. अशा परिस्थितीत जवळचा पैसा आटल्याणे जिवन जगणं कठिण झाल असतांना अन्य वस्तू खरेदी करण्याचा तर विचारच दुर राहिला. आजही परिस्थिती पुर्व पदावर आलेली नाही. जगण्या साठीचा संघर्ष सुरू असतांना वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडत आहे. श्रावण महिना सुरू होण्या पुर्वी चिकन विक्रेत्यांनी धुम ठोकली तर सण उस्तवांच्या काळात महत्वपुर्ण वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्याने सामान्य वर्गाच्या आनंदावर विर्जन आले आहे. प्रत्येक वस्तूंचे भाव वधारत असून मिळकत मात्र अत्यल्प असल्याने सण उस्तव कसे साजरे करायचे या विवंचनेत नागरिक अडकले आहेत. जागतिक मंदीतून सावरत नाही तोच कोरोनाने रोजगारांचीही संधी हिराऊन घेतल्याने सामान्य कुटुंबाची परवड होत असतांना सण उस्तवांच्या काळात आवश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये सण उस्तवाच्या आनंदातही नैराश्य पाहायला मिळत आहे.