शेतकऱ्याची रोकड लांबविल्या प्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शेतातील पिकांवर फवारनी करण्याकरिता किटक नाशक द्रव्य खरेदी करण्याकरिता शहरात आलेल्या वनोजादेवी येथील एका 60 वर्षीय शेतकऱ्याचे नऊ हजार रुपये चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सध्या शेतांमधिल पिकांवर फवारनी मारण्याचा हंगाम सुरू असून शेतकऱ्याचे किटक नाशक खरेदी करिता तालुक्याच्या ठिकानी रोजचेच जाने येणे सुरू असते. जनार्दन तुकाराम गाडगे (60) रा. वनोजदेवी ता. मारेगाव हा शेतकरी देखील किटक नाशक खरेदी करण्याकरिता 28 ऑगस्टला शहरात आला होता. जटाशंकर चौकातील एका कृषी केंद्रातून किटक नाशक खरेदी केल्यानंतर भाजी खरेदी करिता गेला असता त्याच्या जवळील नऊ हजार रुपये चोरला गेल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने वनी पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास करित सूत्रांकडून माहिती मिळवत सेवानगर येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्याच्यावर भादंवि च्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या जवळून चोरी केलेल्या रक्कमेतिल 2500 रुपये व गुन्हा कर्तेवेळी वापरलेली दुचाकी किंमत 30 हजार रुपये असा एकुण 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नी. वैभव जाधव, डिबी पथकाचे गोपाल जाधव, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली आहे.