WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच, आज आणखी 15 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले!

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरा बरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत असून प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहे. आज आणखी १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १७४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०७ झाली आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाने उछांद मांडला असून दिवसा गनिक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोना संक्रमणाची गती तिव्र झाल्याने आरोग्य विभागही हादरला आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांची कळजी वाहतांना व कोविड केयर सेंटर मधिल रुग्णांवर उपचार करतांना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. शहरातील बहुतांश परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने आरोग्य प्रशासनावर चांगलाच तान पडतांना दिसत आहे. आज १३ तपासणी स्वाबचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर दोन रापिड़ अँटीजन चाचणीचे रेपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढून १७४ झाला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमधे भालर येथील सहा व्यक्ती, लालगुडा येथील एक, काथडे ले-आउट गणेशपूर येथील चार, वसंत विहार येथील दोन, राजूर येथील एक तर पद्मावती नगर येथील एका व्यक्तिचा समावेश आहे. सध्यास्थीतीत कोविड केयर सेंटरला ४५ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. ज्या रुग्णांमध्ये अती सौम्य लक्षणे आहेत त्यांना दोन तीन दिवसांच्या त्रिटमेन्ट नंतर होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आज एका रुग्णाला यवतमाळ येथे हलविण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. प्रशासन नागरिकांना कोविडमुक्त करण्याकरिता हरसंभव प्रयत्न करित असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share