WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील आणखी सहा व्यक्तींना कोरोनाची लागण, तालुक्यातील रुग्ण झाले १८८

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्रशासनही चिंतेत आले असून नागरिकही चांगलेच भयभीत झाले आहेत. सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडाही चांगलाच फुगत चालला आहे. आज आणखी सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातुन पूर्णपने बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला असून कोरोनाची लाट तीव्र रूप धारण करतांना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनही चांगलेच चिंतेत आले आहे. काही केल्या कोरोना संक्रमणाची गती कमी होतांना दिसत नसून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने तालुक्यातील जनजीवन चांगलेच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १२ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी सहा व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर सहा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण १२०५ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आणखी २७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २६० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी २८ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत, तर १३ व्यक्तींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ३७ व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यस्थितीत कोविड केयर सेंटरमध्ये ६४ व्यक्तींना विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात ४९ प्रतिबंधित क्षेत्र असून ग्रामीण भागात १५, तर शहरात ३४ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती शहरातीलच असून यामध्ये सानेगुरुजी नगर येथील एक, टागोर चौक एक, समृद्धी अपार्टमेंट एक, शिवनेरी चौक एक, जैन ले-आऊट एक तर टिळक चौक येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८ झाली असून ११० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्या करिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share