WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गरीब मतिमंद मुलाच्या शास्त्रक्रियेकरिता रवी बोढेकर यांनी मदतीचा हात देत केले आर्थिक साहाय्य !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

राजकीय पदाधिकारी म्हणून चोख कर्तव्य बजावत असतांना मानसन्मानाची भूक न बाळगता व राजकीय पक्षाचे तालुकास्तरीय पद मिळाल्याने हुरळून न जाता सामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता सामन्यांत मिसळून सामान्यांसारखे वागून सर्वसामान्यांची जाणीव ठेऊन नेहमी सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या शिवसेना तालुका प्रमुख रवी बोढेकर यांचे सामाजिक कार्य ही वाखाणण्या जोगे आहे. एका मतिमंद मुलाच्या किडनीच्या शस्त्रक्रिये करिता ३४ हजार रुपयांची उदार अंतःकरणाने मदत करणाऱ्या रवी बोढेकर यांनी आपल्या सामाजिक दातृत्वाचा परिचय दिला आहे. मागील वर्षी बामणी फाटा येथे खुल्या जागेत रवी बोढेकर यांच्या अध्यक्षतेत शिव गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून कोणत्याही प्रकारचे ढोलताशे न लावता गणरायाचे अगदी साधेपणाने विसर्जन केले. मागील वर्षी त्यांच्या उत्कृष्ठ नियोजनामुळे जमा झालेल्या वर्गणीतून ३४ हजार रुपये वर्गणी शिल्लक राहिली. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गेणेशोत्सव साजरा न करण्याच्या शासन व प्रशासनाच्या सूचनांचे मनोभावे पालन करून सार्वजनिक मूर्तीची स्थापना न करता तसेच कोणतेही अन्य सोपस्कार न करता मागील वर्षीची उर्वरित वर्गणी गरजू गरीब व्यक्तीच्या उपचाराकरिता खर्ची करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. या वर्गणीतून एखाद्या अती गरजू व्यक्तीवरील उपचाराला हातभार लावून त्याला जीवनदान मिळाल्यास ती गणरायाची खरी आराधना ठरेल व गणरायाच्या भक्तीचे प्रतीक ठरेल ही भावना रवी बोढेकर यांची होती.

अशातच कोल ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर असलेल्या सोमेश्वर ढवस याच्या मतिमंद मुलाला किडनीचा आजार जडल्याचे समोर आले. त्याच्या शास्त्रक्रियेकरिता १ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा खर्च ऐकून गरीब ड्राइवर अक्षरशः हादरून गेला. कोरोनाच्या या काळात एक तर बरोबर कामे नाहीत, त्यातल्यात्यात उदरनिर्वाहाचे संकट, हलाकीचे जीवन जगत असतांना मुलाला किडनीचा आजार जडल्याने सोमेश्वराच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाच्या उपचाराच्या चिंतेने ग्रासलेल्या सोमेश्वरला अन्य सहकारी ड्रायव्हरांनी रवी बोढेकर यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने नेले असता रवी यांनी जराही विचार न करता गणेशोत्सवाची उर्वरित वर्गणीची रक्कम त्याच्या मुलाच्या उपचाराकरिता त्वरित त्याच्याकडे सुपूर्द केली. व स्वतःही ऐच्छिक मदत करून पैशाची आणखी अडचण लागल्यास निसंकोच माझ्याकडे येण्याचे सांगून त्याचे मनोधेर्य वाढवले. आज त्या ड्रायव्हरच्या मुलाची शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली असून मुलगा ठणठणीत बरा असल्याचे त्या ड्रायव्हरने कळविले आहे. रवी बोढेकर नेहमी सामान्यांच्या मदती करिता तत्पर असतात. शहरा बरोबरच ग्रामीण भागातील लोकं ही त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत असतात. व ते त्यांचे योग्यरित्या निराकारणही करतात. कोरोना काळातही त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. परिसरात निर्जंतुकी करणाची फवारणी करण्याची त्यांची संकल्पना पक्षाने राबविली. लॉकडाऊन काळात जेवणाचे डबे व धान्याच्या किट्सही वितरित करून जनसामान्या विषयीची जनसेवेची तळमळ त्यांच्या कार्यातून जनतेच्या दृष्टिपथास पडली आहे. लॉकडाउनच्या या संकटाच्या काळात एका गरीब कुटुंबातील मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता ३४ हजार रुपयांची उर्वरित वर्गणीची रक्कम देऊन व स्वतःही ऐच्छिक मदत करून शिवसेना तालुका प्रमुख रवी बोढेकर यांनी आपले सामाजिक दातृत्व सिद्ध केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share